लॅबमधील नायट्रोजनच्या टँकचा स्फोट होऊन इमारतीचा काही भाग कोसळला, महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:25 AM2020-09-18T11:25:09+5:302020-09-18T11:30:39+5:30
मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळच्या सेंच्युरी बिल्डिंगचा भाग या दुर्घटनेत कोसळला.
मुंबई - लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या लिक्विड नायट्रोजन टँकचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत इमारतीचा काही भाग कोसळला असून, या दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी झाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळच्या सेंच्युरी बिल्डिंगचा भाग या दुर्घटनेत कोसळला. दरम्यान, या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुचित रश्मी कौर असे या जखमी महिलेचे नाव आहे.