Join us

...तर मनपा कर्मचारी आज रात्रीपासून संपावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 3:50 AM

मुंबई महानगरपालिकेने सामुदायिक गट विमा योजना बंद केल्याने मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने सामुदायिक गट विमा योजना बंद केल्याने मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. त्यात बोनसच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून गुरुवारी मध्यरात्रीपासून मनपा कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची खात्रीलायक माहिती मनपातील प्रमुख कामगार संघटनांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीमधील एका नेत्याने दिली आहे.पत्रकार परिषदेत म्युनिसिपल मजदूर युनियनसह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी-महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, बृहन्मुंबई मनपा कामगार कर्मचारी महासंघ, मुंबई मनपा शिक्षक सेना, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेना या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती होते. या संघटनांनी स्थापन केलेल्या समन्वय समितीने कर्मचारी व अधिकाºयांच्या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी, २५ आॅक्टोबरला दुपारी दोन वाजता आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. हा मोर्चा म्हणजे मनपा आयुक्तांना शेवटचा अल्टिमेटम असेल. मोर्चाची दखल घेत आयुक्तांनी कामगारांच्या मागण्यांवर ठोस भूमिका घेतली नाही, तर गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याची माहिती संबंधित नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.बायोमेट्रिकमधील त्रुटींमुळे कामगारांच्या वेतनाला कात्री लागत आहे. प्रथम त्रुटी दूर करून हजेरीमध्ये सुसूत्रीकरण करावे. तसेच बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडू नये, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.>संपाचा फटका सर्वांनासमन्वय समितीने गुरुवारी काढलेल्या मोर्चानंतरही मनपा आयुक्तांना जाग आली नाही, तर अत्यावश्यक सेवेसह सर्व कामगार गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांना या संपाचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका