महापालिकेने थकवला ११० कोटींचा कांदळवनाच्या संवर्धनासाठीचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:59 AM2018-12-22T03:59:38+5:302018-12-22T04:00:19+5:30

मच्छीमारांकडून विरोध सुरू असतानाही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाले खरे. मात्र, कांदळवनाच्या संरक्षणासाठी देय असलेले ११० कोटी रुपये महापालिकेने अद्याप मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आॅफ महाराष्ट्राकडे जमा केलेले नाहीत.

 NMC gets Rs 110 crore fund for conservation of cane cultivation | महापालिकेने थकवला ११० कोटींचा कांदळवनाच्या संवर्धनासाठीचा निधी

महापालिकेने थकवला ११० कोटींचा कांदळवनाच्या संवर्धनासाठीचा निधी

Next

मुंबई - मच्छीमारांकडून विरोध सुरू असतानाही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाले खरे. मात्र, कांदळवनाच्या संरक्षणासाठी देय असलेले ११० कोटी रुपये महापालिकेने अद्याप मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आॅफ महाराष्ट्राकडे जमा केलेले नाहीत. प्रकल्प सुरू करण्यापूर्वीच ही रक्कम देण्याचे ठरले असताना अद्याप महापालिकेकडून कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत, असे सूत्रांकडून समजते.
कोस्टल रोड प्रकल्पाच्या नियोजनावर गेली तीन वर्षे काम सुरू होते. महापालिकेने या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध १७ प्राधिकरणांच्या परवानग्या घेतल्या. त्याचप्रमाणे या प्रकल्पासंदर्भात गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या दोन टक्के रक्कम कांदळवनाच्या संरक्षणासाठी देण्याचा निर्णय झाला होता.
ही रक्कम समुद्र जीव व कांदळवनाच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ११० कोटी रुपये जमा करण्याचे स्मरण महापालिकेला करण्यात आले आहे.
ही रक्कम प्रकल्प सुरू होण्याआधी अथवा सुरू होताना जमा करण्याची सूचना तज्ज्ञ समितीने महापालिकेला केली होती. तसेच याबाबतचा अहवाल पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यास सांगण्यात आले होते.
मात्र, या प्रकल्पात कांदळवनाचे नुकसान होत नसल्याने निधी देण्याचा प्रश्न येत नसल्याचा सूर आता महापालिका अधिकारी आळवत आहेत. परंतु, या प्रकल्पामुळे समुद्री जीवांवरही प्रभाव पडणार असल्याने ही रक्कम जमा करण्याचे सांगण्यात आले होते असे समजते.

असे होणार प्रकल्पाचे काम

नरिमन पॉइंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. सागरी मार्ग
पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी-लिंकपर्यंत या ९.९८ कि.मी.चे काम २०१९ पर्यंत करण्यात येईल.
त्यानंतर वांद्रे सी-लिंक ते कांदिवली या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येईल.
किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून कोस्टल रोडची बांधणी केली जाईल.
या कोस्टल रोडसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title:  NMC gets Rs 110 crore fund for conservation of cane cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.