महापालिका म्हणते वर्षभरात 12 रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू
By admin | Published: November 23, 2014 12:54 AM2014-11-23T00:54:20+5:302014-11-23T00:54:20+5:30
मुंबईत वर्षभरामध्ये डेंग्यूमुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून 76क् रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Next
मुंबई : मुंबईत वर्षभरामध्ये डेंग्यूमुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून 76क् रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. शुक्रवारी पालिकेच्या वैद्यकीय अधिका:यांची बैठक झाली. यामध्ये सहा संशयित डेंग्यू रुग्णांपैकी दोनच रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे. त्या रुग्णांना डेंग्यूची झाला तरीही त्यांच्या मृत्यूचे कारण डेंग्यू नव्हते. पण नेमके कारण सांगण्यास अधिका:यांनी स्पष्ट नकार दिला.
मुलुंड येथील रहिवासी के. राधाकृष्णन आणि खार येथील 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. के. राधाकृष्णन यांना 8 नोव्हेंबरला फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर खार येथे राहणा:या 28 वर्षीय तरुणाला 15 नोव्हेंबर रोजी जीवनज्योत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खुशबुन्नीसा अन्सारी (36), विजय भोसले (35) व केईएममधील चार महिन्यांच्या मुलीचा मृत्यू हे डेंग्यूमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, यांचा मृत्यू डेंग्यूमुळे नाही तर अन्य कारणांमुळे झाल्याचे या बैठकीमध्ये जाहीर केले. (प्रतिनिधी)