Join us

नाल्यात कचरा टाकणाऱ्यांसाठी महापालिकेचा ‘ग्रील’चा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:23 AM

तीन लाख रूपयांची दंड वसुली; गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर आघाडीवर

मुंबई : नाल्यांमध्ये कचरा टाकणाºया स्थानिक रहिवाशांना महापालिकेने अखेर कायद्याचा बडगा दाखविला आहे. नाल्याच्या परिसरात तैनात गस्ती पथकांनी काही दिवसांतच अशा रहिवाशांकडून सुमारे तीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. परंतु, अशा कारवार्इंवर नागरिकांकडून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या भागातून हा कचरा टाकण्यात आल्याचा शोध घेण्यासाठी नाल्यांत विशिष्ट अंतरावर ग्रील बसविण्यात येत आहे. कचरा ज्या भागातून टाकण्यात आला आहे, तो भाग कोणता हे स्पष्ट होण्यासाठी नाल्यांमध्ये ठराविक अंतरावर ह्यग्रीलह्ण बसविण्यात येत आहेत. सफाई करुनही यापैकी ज्या ग्रीलमध्ये पुन्हा कचरा आढळून येईल, त्या भागात पथकाची गस्त वाढविण्यात येईल. तसेच त्या परिसरातील संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल.नालेसफाईनंतरही मुंबईतील नाले पावसाळ्यात भरुन वाहतात. यामागचे कारण शोधल्यानंतर नाल्यांच्या परिसरातील नागरिक कचरा टाकत असल्याचे उजेडात आले. या रहिवाशांना वारंवार ताकीद देऊनही नाल्यांत कचरा टाकणे सुरुच असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे नाल्यांत कचरा टाकणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यानंतरही नाल्यांची कचराकुंडीच झाल्याने पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला.संपूर्ण २४ विभागात प्रत्येकी एक गस्ती पथक नियुक्त केले. या पथकामध्ये पोलिसांचाही समावेश करण्यात आला. गेल्या काही दिवसांत पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकाने दोन लाख ९४ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर नाल्यांमध्ये लोकांनी कचरा टाकून नये, यासाठी ठिकठिकाणी फलकदेखील बसविण्यात येत आहेत. ह्यमुंबई पोलीस अधिनियम १९५१ह्ण नुसार नाल्यांत कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे.गोवंडी भागात सर्वाधिक कारवाईमानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर भागातून सर्वाधिक ९३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर वरळी, लोअर परळ, वरळी कोळीवाडा, प्रेम नगर ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग येथील नाल्यांच्या परिसरातून ३२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या खालोखाल कुर्ला ‘एल’ विभागातून ३० हजार रुपये, बोरिवली विभागातून रुपये २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.कचरा टाकणाºयांना दोनशे रुपये दंडकेवळ नाल्यांतच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणीही नाल्यांमध्ये कचरा टाकणाºयांवर ह्यमुंबई पोलीस अधिनियम १९५१ह्ण नुसार कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दोषी व्यक्तींकडून दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत नाल्यालगतच्या ज्या भागातून अधिक कचरा टाकण्यात आला, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे.