अनधिकृत बांधकामांवर कारवाईच नाही

By Admin | Published: February 11, 2015 10:48 PM2015-02-11T22:48:36+5:302015-02-11T22:48:36+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या या प्रभागात अनधिकृत चाळी व इमारतीचे प्रचंड पीक आले आहे. याशिवाय, प्रभागातील प्रमुख समस्या पाण्याची

No action on unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांवर कारवाईच नाही

अनधिकृत बांधकामांवर कारवाईच नाही

googlenewsNext

दिपक मोहिते, वसई
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या या प्रभागात अनधिकृत चाळी व इमारतीचे प्रचंड पीक आले आहे. याशिवाय, प्रभागातील प्रमुख समस्या पाण्याची असून गेली अनेक वर्षे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. पाण्याच्या प्रश्नावरून स्थानिक नगरसेवकाला अनेक वेळा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मध्यंतरीच्या काळात प्रचंड ओरड झाल्यानंतर अनेक भागात स्टँडपोस्ट उभारण्यात आले. तरीही पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकली नाही.
प्रभागातील सातीवली परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु या क्षेत्रातील कारखान्यांना योग्य त्या सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. मुख्य रस्त्याचे रूंदीकरण झाले. रूंदीकरणाचे काम हे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. प्रभागाअंतर्गत रस्त्याची कामे आजही जैसे थे स्थितीत आहेत. औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील कामगार या प्रभागातील अनेक अनधिकृत चाळीत स्थिरावले. पूर्वी ग्रामपंचायती असताना अनेक विकासकामे प्रलंबित होती त्यापैकी काही विकासकामे मार्गी लागली तर आजही अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. चाळींचा सुळसुळाट असल्यामुळे कचरा साफसफाईचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

Web Title: No action on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.