‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाची तपासणी प्रत्येक मेल, एक्स्प्रेसमध्ये होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:03 AM2019-08-10T01:03:06+5:302019-08-10T06:32:03+5:30

खाद्यपदार्थांचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा अहवाल घेतला जाईल

The 'No Bill, No Payment' program will be checked in every mail, express | ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाची तपासणी प्रत्येक मेल, एक्स्प्रेसमध्ये होणार

‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाची तपासणी प्रत्येक मेल, एक्स्प्रेसमध्ये होणार

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाची माहिती प्रत्येक प्रवाशांपर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) अधिकाऱ्यांकडून प्रत्येक मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रमाची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना विक्रेत्यांकडून बिल घेण्याचे आवाहन केले जाईल. यासह खाद्यपदार्थांचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांच्या वागणूकीचा अहवाल भरून घेतला जाईल.

रेल्वे मार्गावर ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रम सुरू करण्यात आले आहे. याद्वारे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील अथवा मेल, एक्स्प्रेसमधील स्टॉलवरून खाद्यपदार्थ खरेदी केल्यावर विक्रेत्यांकडून बिल मागणे आवश्यक आहे. विक्रेत्यांकडून बिल न दिल्यास खाद्यपदार्थ मोफत मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले आहे. आयआरसीटीसीच्या अधिकाºयांद्वारे या उपक्रमाची माहिती प्रवाशांना देण्यासाठी आणि विक्रेत्यांकडून होणाºया लूटीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘नो बिल, नो पेमेंट’ची तपासणी केली जाणार आहे.

आयआरसीटीच्यावतीने जुलै महिन्यात लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्स्प्रेस मध्ये कल्याण आणि इगतपुरीच्या दरम्यान ‘नो बिल नो पेमेंट’ उपक्रमाची माहिती दिली. यासह लखनऊ सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी ते सीएसएमटी दरम्यान माहिती देण्यात आली. रेल नीर, चहा, कॉफी, इतर खाद्यपदार्थाचे बिल मिळाले नाही तर, मोफत पदार्थ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
पवन एक्स्प्रेसमध्ये ‘नो बिल नो पेमेंट’ उपक्रमाबाबत विक्रेते आणि प्रवाशांकडून सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र पुष्पक एक्स्प्रेसमध्ये मिश्र प्रतिसाद मिळाला. ‘क्यू आर’ कोडमुळे प्रवाशांना खाद्यपदार्थाची अधिक माहिती मिळत आहे. यासह २४ प्रवाशांना बिल देण्यात आले नसल्याने विक्रेत्यांकडून मोफत खाद्यपदार्थ घेतले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी हा उपक्रम राबविला जात आहे, असे आयआरसीटीच्या अधिकाºयांनी सांगितले.

मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांची जादा रक्कम प्रवाशांकडून उकळली जाते. ही लूट रोखण्यासाठी आणि प्रवाशांना उच्चप्रतीचे खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी ‘नो बिल, नो पेमेंट’ उपक्रम सुरू केला आहे. मेल, एक्स्प्रेसमध्ये उपक्रमाची तपासणी केली जाईल. यावेळी प्रत्येक प्रवाशांकडून खाद्यपदार्थ आणि कर्मचाºयांच्या वागणुकीचा अभिप्राय घेतला जाईल.
- राहुल हिमालीयन, पश्चिम झोन -मुंबईचे समुह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी

Web Title: The 'No Bill, No Payment' program will be checked in every mail, express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे