संगीताला कोणतीही सीमा रोखू शकत नाही - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:15 AM2023-03-24T09:15:12+5:302023-03-24T09:15:48+5:30

विजय दर्डा पुढे म्हणाले, ‘संगीत आपल्या सर्वांच्या आत्म्यात वसले असल्याने ते अजरामर आहे. संगीतच मानवता असून, संगीतातच मानवता वास करते.

No Boundaries Can Stop Music - Vijay Darda | संगीताला कोणतीही सीमा रोखू शकत नाही - विजय दर्डा

संगीताला कोणतीही सीमा रोखू शकत नाही - विजय दर्डा

googlenewsNext

मुंबई : ‘असे म्हणतात की सर्वप्रथम आवाज बनला आणि आवाजाच्या उतार-चढावातून सुरांची निर्मिती झाली. सुरांच्या संयोगातून बोल जन्माला आले. ते रागांच्या धाग्यात गुंफल्याने हेच बोल गीत बनले. संगीताशिवाय आपण श्रेष्ठ जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. संगीतात ताकद असून, भावनांना स्पर्श करण्याची शक्ती आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. 
विजय दर्डा पुढे म्हणाले, ‘संगीत आपल्या सर्वांच्या आत्म्यात वसले असल्याने ते अजरामर आहे. संगीतच मानवता असून, संगीतातच मानवता वास करते. संगीताला समृद्ध करण्यासाठी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार काम करत आहे. हा पुरस्कार माझी दिवंगत पत्नी ज्योत्स्ना दर्डांच्या स्मृतीमध्ये सुरू करण्यात आला आहे. या कामी राजेंद्र दर्डा आणि आशू दर्डा यांचे अनमोल योगदान 
आहे. बालपणापासूनच ज्योत्स्ना संगीताची उपासक होती. विशेषत: मोठमोठ्या पंडितांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी आपल्या कलेला पुढे नेले. 

Web Title: No Boundaries Can Stop Music - Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.