हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर याअनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मास्क वापरण्यासंदर्भात नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही किंवा मार्गदर्शक तत्वेही अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमात वेगवेगळ्या स्वरूपाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. या वृत्तांमध्ये नमूद केले आहे की, ‘नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे.’ असे कोणतेही आवाहन पालिकेने केलेले नाही,असे जनसंपर्क विभागाने1 स्पष्ट केले.हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय, आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन नाही - मुंबई महापालिका
By जयंत होवाळ | Published: October 19, 2023 2:14 PM