Join us

दर्शनच्या आत्महत्येमागे जातिभेद नाही...!, आयआयटीच्या चौकशी समितीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 6:02 AM

दर्शनच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईकडून स्थापित करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशी समितीकडून देण्यात आला आहे.

मुंबई : विविध अभ्यासक्रमांतील दर्शनची शैक्षणिक कामगिरी विशेषतः अर्ध्या शैक्षणिक सत्रानंतर खालावली होती. त्याच्या खालावत जाणऱ्या शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर गंभीररीत्या परिणाम झाला असावा. दर्शन सोलंकी याच्या बहिणीच्या वक्तव्याव्यतिरिक्त आयआयटी मुंबईमधील त्याच्या वास्तव्यादरम्यान जातिभेदाचा कोणताही पुरावा दिसून आला नाही. विविध शक्यतांची पडताळणी केल्यानंतर दर्शनच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईकडून स्थापित करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशी समितीकडून देण्यात आला आहे.

दर्शन सोलंकीने आयआयटीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याची चौकशी करण्यासाठी घटनेच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राध्यापक नंद किशोर, प्रा. सुवर्ण कुलकर्णी, प्रा. भरत अडसूळ, सीबीराज पिलाय यांच्यासह आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची १२ जणांची अंतर्गत चौकशी समिती नेमली. चौकशीसाठी समितीने कॅम्पसमधील एकूण ७९ जणांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. या माहितीच्या आधारे समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला असून परीक्षेत कमी गुण मिळाल्याने दर्शनने आत्महत्या केली असून आत्महत्येमागे जातिआधारित भेदभावाचा कोणताही विशिष्ट पुरावा नाही, असा निष्कर्ष नमूद केला आहे.

चौकशी समिती पारदर्शक नाहीदरम्यान, आयआयटी मुंबईची ही चौकशी समिती पारदर्शक आणि स्वायत्त नसल्याचे आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (एपीपीएससी) संघटनेचे म्हणणे आहे. 

जातिभेदाबद्दल समितीने काय म्हटले आहे ?चौकशी समितीने दर्शनचे मित्र, विंगमेट्स, शिक्षक, मार्गदर्शक, हॉस्टेलचे कर्मचारी, एसी / एसटी प्रवर्गातील वरिष्ठ, कुटुंबातील काही सदस्य आणि इतर संबंधित सर्वांकडून माहिती घेतली. दरम्यान, या सर्वांना समितीने दर्शनने कधीही, कुठेही, केव्हाही जातीविषयक भेदभावासंदर्भात सांगितलं होते का किंवा तुम्हाला कधी याबद्दल काही जाणवले का किंवा शंका आली का, असा प्रश्न विचारला. मात्र, यापैकी कोणीही दर्शनसोबत कुठल्याही प्रकारचे जातिभेद झाले नसल्याचे समितीकडे नमूद केले. दर्शन आपल्या कास्ट आयडेंटिटीबाबत संवेदनशील होता असे दर्शनच्या एससी/ एसटी प्रवर्गातील मित्रांनी नमूद केल्याचे समितीने म्हटले आहे.

टॅग्स :आयआयटी मुंबईमृत्यू