Join us

लग्नासाठी पोरगी मिळेना; जन्मदर आणखी घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 1:17 PM

या मध्ये १७१ मुलींचे घरीच बाळंतपण झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात २०२२ मध्ये  ६९,२०९ मुले आणि मुलींची संख्या  ६४,४७३ होती. भविष्यात मुलींची संख्या अशीच कमी होत राहिली, तर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. 

६४ हजार मुली पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये मुलांची संख्या ६९ हजार २०९ होती, तर मुलींची संख्या ६४ हजार ४७३ इतकी होती. या मध्ये १७१ मुलींचे घरीच बाळंतपण झाले आहे. 

गर्भनिदान किंवा स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे लक्षात आल्यास महापालिकेच्या संकेतस्थळावर माहिती देण्याचे किंवा १८००२२३३४४७५ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन महापालिकेने  केले आहे

सध्याचा बाल मृत्युदर २६.७२ मुंबईचा सध्याचा बाल मृत्यूदर २६.७२ आहे. पाच वर्षांखालील मृत्यूदर ३८.७ आणि १ हजार जिवंत बाळांचा समावेश आहे. मुंबईचा सध्याचा एमएमआर ८८ आहे.

गेल्या पाच वर्षांतील मुले-मुली किती जन्मली? वर्ष     मुले    मुली      २०२२         ६९२०९         ६४४७३ २०२१         ५८९३०      ५४ ७३९ २०२०         ६२०२४       ५८१६४ २०१९         ७६८८२       ७३०४५ २०१८         ७८२६५       ७३०४५ 

लग्नासाठी मुली मिळेनात मुंबईसारख्या मोठ्या शहरात लोकसंख्या जास्त आहे. मात्र, काही ग्रामीण भागात मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. 

काेण काय म्हणतंय....

जग आधुनिक झाले तरी काहींचे विचार मात्र जुनेच आहेत. त्यामुळे वंशाला मुलगा हवा, अशा विचाराने मुली नको म्हणणाऱ्यांसाठी अधिक काम करण्याची गरज आहे.- श्रद्धा गवस, सामाजिक कार्यकर्त्या  

 

टॅग्स :मुंबईलग्ननगर पालिका