Join us  

मोग्रजच्या सरपंचांवर अविश्वास ठराव

By admin | Published: April 08, 2015 10:29 PM

कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीचे सरपंच, शिवसेनेचे गुल्या तांबड्या आगिवले यांच्याविरु द्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार

नेरळ : कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीचे सरपंच, शिवसेनेचे गुल्या तांबड्या आगिवले यांच्याविरु द्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. कर्जत तहसीलदार यांच्याकडे ठराव दाखल झाल्यानंतर १0 एप्रिल रोजी त्या अविश्वास ठरावावर चर्चा होणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाने दिली. मार्च २०१४ या महिन्यात मोग्रज ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे गुल्या तांबड्या आगिवले यांची सरपंचपदी निवड झाली होती. त्यावेळी गुल्या आगिवले आणि अर्जुन सकपाळ यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाली होती, त्यामुळे तेथील सरपंच चिठ्ठीवर ठरला होता. दरम्यानच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे खटके उडाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्र येऊन सरपंच आगिवले यांना विरोध करण्यास सुरु वात केली. अखेर ग्रामपंचायतमधील दहा सदस्यांनी सर्वसाधारण गटातील सरपंच गुल्या तांबड्या आगिवले यांच्याविरु द्ध कर्जत तहसीलदार यांच्या कार्यालयात हजेरी लावून अविश्वास ठराव दाखल केला. या सर्व दहा सदस्यांनी सरपंच गुल्या आगिवले यांच्याविरु द्ध मनमानी कारभार करणे, कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेणे आणि वैयक्तिकपणे निर्णय घेणे असे आरोप केले आहेत. (वार्ताहर)