मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात समन्वय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:04+5:302021-01-18T04:07:04+5:30

मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात समन्वय नाही! शेतकरी कायद्याच्या मोर्चाविरोधात दोन गटात विखुरली काँग्रेस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

No coordination between Mumbai Congress and Maharashtra Congress! | मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात समन्वय नाही!

मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात समन्वय नाही!

Next

मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात समन्वय नाही!

शेतकरी कायद्याच्या मोर्चाविरोधात दोन गटात विखुरली काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकरी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस यांच्यात कोणताही समन्वय नाही, असाच संदेश मुंबईसह महाराष्ट्रात गेलेला आहे.

अखिल भारतीय काँग्रेसने दिनांक १५ जानेवारी रोजी राजभवनला घेराओ घालण्याचा कार्यक्रम दिला होता. त्यानुसार अध्यक्ष भाई जगताप यांनी १५ जानेवारी रोजी राजभवनला घेराओ घालण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, महाराष्ट्र काँग्रेसने हा कार्यक्रम १६ जानेवारी रोजी घेण्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचे मतदान होते, म्हणून त्यांनी १६ तारीख निवडली होती. त्यांनी मुंबई काँग्रेसला १५ जानेवारी ही तारीख रद्द करुन १६ जानेवारी रोजी मोर्चा घ्यायला सांगितले, त्यावरुनदेखील वाद झाल्याचे कळते. अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ व १६ जानेवारी रोजी राज्यपाल नागपूरला असल्याने मोर्चा नागपूरला घेण्याचे ठरले. परंतु, खरे कारण मुंबई काँग्रेसची विशेष मदत होणार नाही, त्यामुळे हा मोर्चा नागपूरला घेण्यात यावा, असे माजी मंत्र्यांनी सुचविल्याचे समजते.

या मोर्चासाठी अध्यक्ष भाई जगताप यांना काल नागपूरला जावे लागले. तसेच स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्षपद महाराष्ट्र काँग्रेसकडे गेल्यामुळे मनपा तिकीट वाटपदेखील महाराष्ट्र प्रदेशच्या अखत्यारित गेले आहे.

त्यामुळे मुंबई काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व संपल्यात जमा असल्याची टीका सुरू झालेली आहे.

चौकट

प्रचार समिती अध्यक्ष, जाहीरनामा समिती अध्यक्ष, समन्वय समिती अध्यक्षांना अखिल भारतीय काँग्रेसने स्वतंत्र कमिटी नेमण्याचे अधिकार आणि इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या असूनदेखील अजून बसायला स्वतंत्र केबीन मुंबई अध्यक्षांनी दिलेली नाही, असे सुत्रांकडून कळले.

वरिष्ठ माजी मंत्री आपापल्या घरून काम करत असल्याने कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांना याबाबतचे वृत्त कळविले असल्याचे समजते.

---------------------------------------------

Web Title: No coordination between Mumbai Congress and Maharashtra Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.