रूग्णसंख्या शून्याचा षटकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावी विभागात शनिवारी एकाही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही. दुसऱ्या लाटेत धारावी परिसरात तब्बल सहावेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या येथे २१ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीमध्ये एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र यातूनच आकार घेणाऱ्या धारावी पॅटर्नने कोरोनाचा प्रसार रोखला. तर दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ही धारावी पॅटर्न प्रभावी ठरले आहे. जास्तीत जास्त लोकांची चाचणी, बाधितांचे संपर्कातील लोकांना शोधणे, तत्काळ विलगीकरण आणि त्वरित उपचार हे चार सूत्रे पालिकेने येथे कायम ठेवली आहे.
दुसऱ्या लाटे दरम्यान धारावी परिसरातील इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र संपूर्ण धारावी परिसरात पुन्हा एकदा सर्व नागरिकांची चाचणी करण्यात आली. तसेच प्रभावी उपाययोजनांमुळे धारावीमध्ये बाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे.
* यापूर्वी जानेवारी महिन्यात २२, २६, २७, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारीत धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली होती.
* दुसऱ्या लाटेत धारावीत यापूर्वी १४, १५, २३ जून आणि ४, ७ जुलै रोजी शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत रुग्णसंख्या
परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...आजची स्थिती
दादर....९८०५....१४४.....९४७७.... ०४
धारावी....६९३२....२१....६५५२... ००
माहीम....१०१२७....७२....९८५३.... ०६