सकारात्मक! मुंबईत ५५ दिवसांनंतर ‘शून्य’ कोरोना बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:23 AM2021-12-12T05:23:22+5:302021-12-12T05:23:48+5:30

मुंबईकरांना दिलासा; दिवसभरात आढळले २५६ रुग्ण

no coronavirus deaths in mumbai again after 55 days omicron variant patients also got discharge | सकारात्मक! मुंबईत ५५ दिवसांनंतर ‘शून्य’ कोरोना बळी

सकारात्मक! मुंबईत ५५ दिवसांनंतर ‘शून्य’ कोरोना बळी

Next

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मुंबईकरांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मुंबईत शनिवारी ५५ दिवसांनंतर पुन्हा एकदा शून्य कोरोना बळींची नोंद झाली आहे. यापूर्वी, १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत कोरोनाचा एकही मृत्यू झाला नव्हता, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

मुंबईत शनिवारी २५६ रुग्णांची नोंद झाली असून, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. २२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ६५ हजार ११० वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा १६ हजार ३५५ वर पोहोचला आहे. सध्या १ हजार ८०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहर उपनगरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७ लाख ४४ हजार ३७० वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत ४ ते १० डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०३ % टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरांत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २ हजार ५९२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. 

मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. रुग्ण आढळून आल्याने ११ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ४४,३८० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.शहर उपनगरातील सक्रिय रुग्णांपैकी १३५ रुग्णांची प्रकृती पालिकेच्या डॅशबोर्डवर नमूद आहे. तर ९३९ रुग्ण लक्षणविरहित आहेत, ६९९ रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत.

राज्यात शनिवारी ८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण ६४,९१,८०५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के झाले आहे. राज्यात सध्या ६,४५२ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात ८०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ६,६७,५९,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९.९५  टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ७५,०९५ व्यक्ती होम क्वारंटाईन, तर ८६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  

सात ओमायक्रॉन रुग्ण झाले बरे
राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा शनिवारी एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. शनिवारपर्यंत राज्यात एकूण १७ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – ५, पिंपरी चिंचवड -१०, पुणे महापालिका -१ आणि कल्याण-डोंबिवली – १).  यांपैकी सात रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

५१ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित
राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यांपैकी ५१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Web Title: no coronavirus deaths in mumbai again after 55 days omicron variant patients also got discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.