Join us

तूर्तास रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय नाही - अस्लम शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:14 AM

मुंबई : रुग्णसंख्येत वाढ दिसली तर निर्बंध कठोर केले जातील. मात्र, तूर्तास रात्रीची संचारबंदी, जमावबंदीची गरज नसल्याचे, वस्त्रोद्योग मंत्री ...

मुंबई : रुग्णसंख्येत वाढ दिसली तर निर्बंध कठोर केले जातील. मात्र, तूर्तास रात्रीची संचारबंदी, जमावबंदीची गरज नसल्याचे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरु आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तविली आहे. रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज भासेल. तेंव्हा रात्रीची संचारबंदी, जमावबंदी लागू केली जाऊ शकते. मात्र तूर्तास त्याची गरज नाही, असे अस्लम शेख यांनी सांगितले. रुग्णसंख्येत वाढ झाली तर निर्बंध कठोर होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन झालद तर निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. पण, सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अमेरिका, युरोपमध्ये लसीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल, असेही अस्लम शेख म्हणाले.

मंदिरांबाबत योग्यवेळी निर्णय

मंदिरांबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. परिस्थिती नियंत्रणात आली की सर्वधर्मियांसाठी निर्णय घेऊ, असे सांगतानाच सण हिंदुंचा आहे की अन्य कोणत्या धर्माचा हे पाहून कोरोना संसर्ग होत नाही. लोकांच्या जीवाशी खेळून सण साजरे करणे कितपत योग्य आहे, हेसुद्धा ठरवायला हवे, असा टोलाही शेख यांनी भाजप आणि मनसेला लगावला.