Join us

हज यात्रेच्या रद्द बाबत अद्याप निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 8:00 PM

कोरोनामुळे हज यात्रा यावर्षी रद्द करण्याबाबत सौदी सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही

ठळक मुद्दे  यात्रेकरूंचे पैसे सुरक्षित  हज कमिटी मार्फत जाणाऱ्या सव्वा लाख भाविकांकडून त्याच्या प्रवासाच्या श्रेणीनुसार सरासरी पावणे दोन ते दोन लाख खर्च आहे. त्यासाठी यात्रेकरूकडून त्यांच्यासोयीनुसार ३ टप्यात रक्कम भरून घेतली जाते.आतापर्यंत दोन हप्त्यात ही रककम घे

हज यात्रेबाबत अद्याप निर्णय नाही तिसऱ्या हफ्तासमवेत दुसरा हफ्ता भरण्याची सवलत हज कमिटी ऑफ इंडियाचा खुलासा जमीर काझी लोकमत ऑनलाईन मुंबई : ऑगस्टमध्ये होणाऱ्या हज यात्रेबाबत सौदी सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याुमुळे पुर्व नियोजनाप्रमाणे त्यासंबंधीचे वेळापत्रक कायम आहे. त्यामुळे भारतातून हजला जाणार्या यात्रेकरूनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन हज कमिटी आँफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ मकसूद अहमद खान यांनी केले आहे . कमिटी मार्फत जाणाऱ्या भाविकांपैकी ज्यांनी दुसऱ्या हफ्तातील रक्कम अद्याप भरलेली नाही त्यांनी ती तिसऱ्या हप्त्यासमवेत भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे ,त्याबाबतची तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले . इस्लाम धर्मातील प्रमुख पाच मुलतत्वांपैकी एक असलेल्या हज यात्रा दरवर्षी सौदी अरेबियात मक्का मदिना येथे बकरी ईदच्या कालावधी दरम्यान भरत असते. त्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक जमा होत असतात .त्यासाठी भारतातून पावणे दोन लाखवर भाविक सहभागी होतात.हज कमिटी ऑफ इंडियाच्यावतीने सव्वा लाखजणांना पाठविण्यात येते . इस्लामी जिल्हज महिन्यात होणारी ही यात्रा यंदा आँगस्टच्या सुरवातीला होत आहे . मात्र कोरोनाच्या पादुर्भावामुळे यंदा हज यात्रेवर काळे ढग पसरले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गेल्या महिन्यापासून उमरा यात्रा रद्द केली आहे ,त्यासाठी दिलेले सर्व व्हिसा निलंबित केले आहेत , त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये होणारी हज यात्राही रद्द केली आहे ,असे मॅसेज व व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.त्यापाश्वभूमीवर हज समितीचे सीईओ खान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ,' आम्ही सातत्याने सौदी सरकारच्या सम्पर्कात आहोत, हज यात्रा रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही ,त्यामुळे पूर्ववेळापत्रक कायम आहे ,त्यासंबंधी एखादा निर्णय झाल्यास तातडीने कळविले जाईल , त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही ,हजसाठीची तिसऱ्या टप्यात भरावयाची रक्कमेबाबतची तारीख लवकरच कळविली जाईल ,ज्यांनी दुसऱ्या टप्यातील हप्ता भरलेला नाही त्यांना तो या कालावधीत भरण्याची मुभा दिली आहे .