Join us

लस घेतल्यानंतरही कोणता त्रास जाणवला नाही, प्रकृती उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:07 AM

लस घेणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिक्रिया ....वांद्रे कुर्ला संकुल येथील प्रतिक्रियाकोरोनाची पहिली लस मला मिळाली, याचा खूप आनंद होत ...

लस घेणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिक्रिया ....

वांद्रे कुर्ला संकुल येथील प्रतिक्रिया

कोरोनाची पहिली लस मला मिळाली, याचा खूप आनंद होत आहे. मला लस घेताना कोणतीही भीती वाटली नाही. लस घेतल्यानंतरही कोणता त्रास जाणवला नाही. माझी प्रकृती उत्तम आहे. लस घेतल्यानंतरही योग्य आहार घ्या आणि सुरक्षित रहा.

- डॉ. मधुरा पाटील (वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात पाच महिन्यांपासून आहारतज्ज्ञ)

.................................

लस घेतल्यानंतरही मला कोणताही त्रास जाणवला नाही. मी अगदी ठणठणीत असून आता कामावरही रुजू होत आहे.

- डॉ. जवाहर पंजवाणी (खासगी दवाखाना)

.......................

या ऐतिहासिक क्षणी पहिल्याच यादीत माझे नाव आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. सकाळी साडेसहा वाजता मला पालिकेचा एसएमएस आला. त्यानुसार मी लगेच वांद्रे-कुर्ला संकुलात आलो. गेले दहा महिने आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. मग आता लस घेण्याबाबत भीती कशाला बाळगता? लस घेण्यासाठी बिनधास्त या.

- डॉ. सचिन जैन (हिंदुजा रुग्णालय, खार)

..................................................

सर्वांनी ही लस घ्यावी. त्यानंतरच लसीबाबतची शंका दूर होईल. संपूर्ण देश कोरोनमुक्त होऊ शकेल.

- डॉ. हरीश शेट्टी (हिरानंदानी रुग्णालय)

......................