पाटकर रोड परिवहन बस साठी खुला राहणारडोंबिवली: केळकर रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम बुधवारी मध्यरात्रीपासून हाती घेण्याता आले. त्या कामामुळे रस्त्याच्या अर्ध्या भागातून जाणा-या अन्य वाहनांना त्रास नसावा यासाठी केळकर रोडचा रिक्षा स्टँड पाटकर रोडवर हलवण्यात आला होता. पण त्यामुळे परिवहनची बससेवा प्रभावित होऊ नये यासाठी केळकर रोडवरच रिक्षा स्टँड कायम ठेवण्यात येणार असून पश्चिमेकडून केळकर रोडवर येणा-या चारचाकी, दुचाकींसह अवजड वाहनांना साधारणपणे एक महिना केळकर रोडवर नो एंट्री असेल असा सामुहिक निर्णय घेण्यात आला.त्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यावर बुधवारी प्रायोगिक तत्वावर रिक्षा स्टँड पाटकर रोडवर हलवण्यात आला. पण त्यामुळे केडीएमटीच्या लोढा, व मानपाडा मार्गावर जाणा-या बससेवा प्रभावित झाल्या. त्यांना अडथळे आले, आणि परिवहनचे नियोजन सपशेल कोलडमले. त्यामुळे बुधवारी रात्री नागरिकांनी प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला मंचजवळ प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यासाठी गुरुवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली, त्या बैठकीत आरटीओ, ट्रॅफिक, नगरसेवक, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, रिक्षा युनियनचे पदाधिकारी, मंचचे प्रतिनिधी, पत्रकार व नागरिकांचा समावेश होता. त्यावेळी झालेल्या ठरावामध्ये एस.व्ही.रोडवरुन शिवमंदिर रोडवर जाणारी वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे. चिपळूणकर रोडवरुन येणा-या रिक्षा केळकररोडवर स्टँडकडे जातील. तसेच ज्या वाहनांना पीपी चेंबर, शिवाजी पुतळा येथून पश्चिमेला जायचे आहेत त्यांनी चिपळूणकर रोड मार्गे टंडन रोड, उड्डाणपूलावर जावे. याचप्रमाणे पश्चिमेकडील वाहने थेट टंडन रोड आणि शिवमंदिर रोडमार्गे एमआयडीसी, मानपाडा रोड, दत्तमंदिर चौक आदी ठिकाणी जातील. केडीएमटीच्या बसेस टंडन रोडमार्गे आल्यानंतर केळकर रोड येथे येतील आणि लगेचच स्वामी विवेकानंद रोडमार्गे डॉ. राथ रोड येथे जातील. त्यानंतर पाटकर रोडमार्गे त्या मानपाडा, लोढा, नांदिवली, नवनीतनगर, गोग्रासवाडी आदी भागात धावतील. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी निवडक ठिकाणी बॅनर लावण्यात येणार असून त्याची जबाबदारी नगरसेवक मंदार हळबे यांनी घेतल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. हळबेंसह रिक्षा युनियनचे काळु कोमास्कर, संजय मांजरेकर यांनी समन्वय साधत वरील उपाययोजना करण्याचे वाहतूक आणि आरटीओ अधिका-यांना आवाहन केले. एसीपी बाबासाहेब आव्हाड, आणि आरटीओ अधिकारी सुर्यकांत गंभीर, पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे आदींनी जे शहराच्या नागरिकांसाठी हितावह आहे ते उपाय तातडीने करण्यासाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. वरील बदल करणे, त्यानूसार वाहतूकीचे नियोजन, अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे १५ स्वयंसेवक किमान ६ ते १० तासांसाठी विविध वेळांमध्ये उपलब्ध व्हावेत असे आवाहन गंभीरे यांनी केले. तसेच महिनाभरासाठी करावे लागणा-या बदलासंदर्भात सगळयांनी दुपारी एकत्रितपणे रस्त्याची पाहणीही केली.
डोंबिवली पश्चिमेच्या वाहनांना महिनाभर केळकर रोडवर नो एंट्री :रिक्षा स्टँड केळकर रोडवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:34 PM
केळकर रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम बुधवारी मध्यरात्रीपासून हाती घेण्याता आले. त्या कामामुळे रस्त्याच्या अर्ध्या भागातून जाणा-या अन्य वाहनांना त्रास नसावा यासाठी केळकर रोडचा रिक्षा स्टँड पाटकर रोडवर हलवण्यात आला होता. पण त्यामुळे परिवहनची बससेवा प्रभावित होऊ नये यासाठी केळकर रोडवरच रिक्षा स्टँड कायम ठेवण्यात येणार असून पश्चिमेकडून केळकर रोडवर येणा-या चारचाकी, दुचाकींसह अवजड वाहनांना साधारणपणे एक महिना केळकर रोडवर नो एंट्री असेल असा सामुहिक निर्णय घेण्यात आला.
ठळक मुद्देरिक्षा स्टँड केळकर रोडवरच