Join us

सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 1:48 PM

Mumbai: अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यातच डॉक्टरांची सरसकट बदली केल्यामुळे सध्या रुग्णांचे हाल होत आहेत.

मुंबई - अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यातच डॉक्टरांची सरसकट बदली केल्यामुळे सध्या रुग्णांचे हाल होत आहेत. माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.ईएसआयसी रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा १४ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. गेली चार साडेचार वर्षे हे रुग्णालय बंद होते. १७ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या आगीच्या घटनेनंतर हे रुग्णालय बंद होते. जेव्हा ते सुरू झाले तेव्हा तिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. पण, अद्याप आयपीडी सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, रक्तपेढी, शस्त्रक्रिया विभाग बंदच आहेत. रक्तचाचणी विभाग, एक्सरे, युएसजी हे विभाग अगदी मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यक ती यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवले जाते किंवा काहीवेळा त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे रुग्णांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत काँग्रेसने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई