मद्य बंदी शहरी महामार्गाला नको!

By admin | Published: March 16, 2017 03:22 AM2017-03-16T03:22:50+5:302017-03-16T03:22:50+5:30

शासनाने दुर्घटना व अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांना दारूच्या विक्रीची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे

No liquor barrier to urban highway! | मद्य बंदी शहरी महामार्गाला नको!

मद्य बंदी शहरी महामार्गाला नको!

Next

मुंबई : शासनाने दुर्घटना व अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांना दारूच्या विक्रीची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यात शहरी भागातील महामार्गास जोडून असलेल्या द्रुतगती मार्गाचा समावेश करू नये, अशी मागणी फॅमिली रेस्टॉरन्ट अ‍ॅण्ड बार असोसिएशनने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयाचे असोसिएशनचे स्वागत केले आहे. मात्र शहरातील द्रुतगती मार्गांना हा नियम लागू करू नये, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. मुळात तांत्रिकदृष्ट्या हे रस्ते महामार्गात येत नाहीत, त्यामुळे शासनाने विचारपूर्वक कार्यवाही करू नये, अशी मागणीही असोसिएशनने पाटील यांच्याकडे केली आहे.हॉटेल व्यावसायिकांनी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आपले कार्य करावे, या मताशी संघटना सहमत आहे. त्यामुळे शहरी भागात जिथे जिथे हे परवाने दिले गेले आहेत, तिथे तिथे कुठलाही बदल करण्यात येऊ नये. त्यातून शासनाला महसूल मिळत आहे. मुंबईसारख्या शहरात त्याचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे द्रुतगती मार्गावरील हॉटेल्स व बार यांना अभय देण्यात यावे, अशी मागणी आहे़(प्रतिनिधी)

Web Title: No liquor barrier to urban highway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.