लॉकडाऊन नको पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:05 AM2021-04-05T04:05:37+5:302021-04-05T04:05:37+5:30

- अनिल फोंडेकर, अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन. अनावश्यक गर्दीवर नियंत्रण गरजेचे सध्या राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता कठोर निर्बंधांची ...

No lockdown but ... | लॉकडाऊन नको पण...

लॉकडाऊन नको पण...

Next

- अनिल फोंडेकर, अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन.

अनावश्यक गर्दीवर नियंत्रण गरजेचे

सध्या राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता कठोर निर्बंधांची गरज आहे. लॉकडाऊन केल्यास गर्दीवर नियंत्रण येईल त्यामुळे लोकांचा वावर कमी झाल्यास निश्चितच रुग्णसंख्या कमी होईल. बाजारपेठा, लोकलच्या वेळा, मॉल, सिनेमागृह येथील प्रवेशावर बंधने घातली पाहिजेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यात तात्पुरत्या कोविड केंद्राची उभारणी, कंत्राट पद्धतीवर मनुष्यबळाची भरती, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र, निर्बंधाची सक्ती करत असताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी यंत्रणांनी घेतली पाहिजे.

- डॉ पार्थिव संघवी, आयएमए सदस्य.

लॉकडाऊनच्या चर्चेमुळे आधीच लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे अशा स्थितीत पूर्णपणे कडक निर्बंध घालताना सामान्यांच्या मूलभूत गरजांचा विचार यंत्रणांनी करावा. मुख्यतः राज्यासह शहरातील लसीकरण मोहीम व्यापक करण्याची अधिक गरज आहे, सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालणे अत्यवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आरोग्यसेवा क्षेत्रासाठी भरीव निधी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ यांची तरतूद करणे आवश्यक आहे. मागील लॉकडाऊनच्या वेळीस मोठ्या प्रमाणात लोकांना मानसिक आरोग्याच्याही समस्या उद्‌भवल्या होत्या, त्यांच्या निराकरणासाठी हेल्पलाईन, समुपदेशन या पातळ्यांवरही प्रयत्न केले पाहिजेत.

- डॉ अभिजित मोरे, जनआरोग्य चळवळ, सदस्य.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने कोरोना चाचण्या वाढवल्या पाहिजेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध करायला हवेत. लॉकडाऊन केल्यास उद्योजक, व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारे मजूर यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. गेल्यावर्षी आपल्याकडे सुविधा नव्हत्या, पण आता लस उपलब्ध आहे त्यामुळे लसीकरण वाढवावे.

- मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष डिक्की.

Web Title: No lockdown but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.