Join us

मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लादणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 8:42 AM

मालाड येथील एका रुग्णालयाला बुधवारी अस्लम शेख यांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील स्थिती अद्याप बिकट नाही. मात्र, अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लाॅकडाऊनपासून दूर राहू शकतो, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.मालाड येथील एका रुग्णालयाला बुधवारी अस्लम शेख यांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारची आकडेवारी पाहिली तर दिवसाला जवळपास दोन हजार नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तरीही स्थिती बिकट आहे, असे म्हणता येणार नाही. पण कठोर निर्बंधांची आवश्यकता आहे. लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना शेख यांनी सांगितले की, मुंबईची स्थिती बिकट नाही. मात्र, अजून कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन लावण्यापासून दूर राहू शकतो. 

यापुढे निर्बंध कठाेर करण्यात येतील. लसीकरणाचा कार्यक्रम योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र, अजूनही काही लोकांत संभ्रम आहे. लसीकरणाबाबत घाबरुन न जाता डॉक्टरांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईकोरोनाची लस