मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ७ मे रोजी ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर ठाणे - वाशी / नेरूळ अप आणि डाउन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली - गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ट्रान्सहार्बर
कुठे : ठाणे - वाशी / नेरूळ अप आणि डाउन जलद मार्गावरकधी : सकाळी ११:१० ते दुपारी ०४:१० पर्यंतपरिणाम : या ब्लॉकदरम्यान ठाणे येथून वाशी / नेरूळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि (वाशी / नेरूळ / पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही.
पश्चिम रेल्वे
कुठे : गोरेगाव ते बोरिवली अप - डाऊन जलद मार्गावरकधी : शनिवारी रात्री ११:४५ ते रविवारी पहाटे ४:१५ वाजेपर्यंतपरिणाम: या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द असणार आहेत. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.