मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:23+5:302021-05-01T04:06:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी हार्बर रेल्वे मार्गावर रविवार २ मे राेजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मात्र, छत्रपती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी हार्बर रेल्वे मार्गावर रविवार २ मे राेजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विभागात मध्य रेल्वे मार्गावर कोणतीही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दिलासा मिळेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर लाइन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान, चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान, सीएसएमटी / वडाळा रोड डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत, तर सीएसएमटी येथून डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत एकही लाेकल धावणार नाही. याचप्रमाणे अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष फेऱ्या चालविल्या जातील. यावेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या त्याच तिकीट किंवा पासवर मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
..........................................