राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 11:58 AM2022-06-25T11:58:13+5:302022-06-25T11:58:27+5:30

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

No MLAs in the state have been ordered to withdraw their protection; Home Minister's Dilip Walse Patil explanation | राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Next

मुंबई- राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली होती. 

एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या या ट्विटनंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरांविरोधात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टीचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. तसंच पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता बैठक होणार आहे.

तब्बल १० तासांनंतर फडणवीस मुंबईत-

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. त्यानंतर १० तासानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत. भाजपाच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. फडणवीस नेमके कुणाला भेटले याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Web Title: No MLAs in the state have been ordered to withdraw their protection; Home Minister's Dilip Walse Patil explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.