भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाही! उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:56 AM2024-06-11T08:56:23+5:302024-06-11T08:57:00+5:30

Uddhav Thackeray News: भाजपसोबत हातमिळवणी करणार, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, असे काहीही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला नकली संतान आणि शिवसेनेला नकली पक्ष, म्हणून हिणवले.  हा अपमान कदापि सहन करणार नाही.

No more joining hands with BJP! Uddhav Thackeray made it clear | भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाही! उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाही! उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

 मुंबई -  भाजपसोबत हातमिळवणी करणार, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, असे काहीही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला नकली संतान आणि शिवसेनेला नकली पक्ष, म्हणून हिणवले.  हा अपमान कदापि सहन करणार नाही. कितीही वावड्या उठल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. यापुढे भाजपबरोबर हातमिळवणी करणार नाही, अशी ग्वाही देत विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीसोबत एकत्रच लढायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असे निर्देश ठाकरे यांनी दिले. 
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर ठाकरे यांनी सोमवारी, शिवसेना भवन येथे उद्धवसेनेचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. 

समाधानकारक यश
- महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढताना आपण भाजपला हरवू शकतो हे दाखवून दिले आहे. यातून दिल्लीश्वरांना आपण एक चांगला संदेश दिला आहे. 
- महाविकास आघाडी म्हणून लढताना मोठा विजय मिळाला नसला तरी तो समाधानकारक आहे असे ठाकरे म्हणाले. 

Web Title: No more joining hands with BJP! Uddhav Thackeray made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.