पालिका रुग्णालयात आता ‘प्रिस्क्रिप्शन’ देणार नाही; निःशुल्क आरोग्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:56 PM2023-11-24T13:56:26+5:302023-11-24T13:56:36+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयुक्तांना निर्देश; सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवा

No more 'prescription' will be given in the municipal hospital | पालिका रुग्णालयात आता ‘प्रिस्क्रिप्शन’ देणार नाही; निःशुल्क आरोग्य सेवा

पालिका रुग्णालयात आता ‘प्रिस्क्रिप्शन’ देणार नाही; निःशुल्क आरोग्य सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई  : महापालिका रुग्णालयात ‘झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ राबवून सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे अशी राबविणारी मुंबई पालिका देशातली पहिली महापालिका ठरणार आहे.

पालिकेच्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ राबविण्यासाठी आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी  आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले आहेत.  ही योजना राबविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गरीब रुग्णांवर खर्चाचा अतिरिक्त बोजा
मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी के.ई.एम रुग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्या चर्चे दरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्सपेंडीचर) खर्चामुळे साधारणतः १०  टक्के नागरिक दारिद्रय रेषेखाली खेचले जातात.  राष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांनी केलेला अभ्यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

५० हजारपेक्षा  अधिक बाह्य रुग्ण 
पालिकेमार्फत ४ वैद्यकीय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान’ देखील कार्यरत आहेत.  यामध्ये  ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण लाभ घेतात.

Web Title: No more 'prescription' will be given in the municipal hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.