टोलबंदच्या केवळ घोषणेने हुरळून जाण्याची गरज नाही - राज ठाकरे
By Admin | Published: April 10, 2015 07:21 PM2015-04-10T19:21:50+5:302015-04-10T19:21:50+5:30
सरकारच्या केवळ टोलबंदच्या घोषणेने हुरळून जाण्याची गजर नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - राज्यातील काही टोलनाक्यावर टोलवसूली करण्यात येणार नाही अशी राज्य सरकारने घोषणा केली आहे असे सांगतानाच सरकारच्या केवळ टोलबंदच्या घोषणेने हुरळून जाण्याची गजर नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मनसेने टोलमध्ये पारदर्शकता यावी यासाठी अनेकदा आंदोलने केली आहेत, टोल वसूलीमध्ये पारदर्शकता यायला हवी, मागील आघाडी सरकारने काही टोलनाके बंद केली आहे परंतू अद्यापपर्यंत त्यांची यादी प्रसिध्द केली नाही. फडणवीस सरकारने काही टोलबंद करण्याचा निर्णय घेतला आहे या यादीत मागील सरकारने घेतलेल्या टोलचा समावेश आहे का ते पाहणे उचित ठरेल असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील ५ टोलनाके, एक्सप्रेस वेवरचे टोलनाके याबाबत सरकार काय भूमिका घेणार आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. फडणवीस सरकार जर मागील आघाडी सरकारचेच धोरण राबवित असतील तर सरकार बदलून काय उपयोग असा चिमटा राज यांनी यावेळी काढला.