Join us

वाहतूकदारांची पोलिसांकडून कोणतीही अडवणूक केली जाणार नाही : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:05 AM

मुंबई : वाहनांच्या कागदपत्रे नूतनीकरणासाठी मालवाहतूकदार तसेच सार्वजनिक बस वाहतूकदारांना राज्य सरकारने यापूर्वीच ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली ...

मुंबई : वाहनांच्या कागदपत्रे नूतनीकरणासाठी मालवाहतूकदार तसेच सार्वजनिक बस वाहतूकदारांना राज्य सरकारने यापूर्वीच ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या वाढीव मुदतीत कागदपत्रांचे नूतनीकरण होईपर्यंत वाहतूकदारांची पोलिसांकडून कोणतीही अडवणूक केली जाणार नसल्याचे आश्वासन गृह आणि वाहतूक राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिले. राज्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त केली होती.

मालवाहतूकदार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यरत बस वाहतूकदारांना आपल्या वाहनांच्या कागदपत्रांचे फेरनूतनीकरण करता येण्यासाठी राज्य सरकारने त्यांना ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. कागदपत्रे नूतनीकरणासाठी दिलेल्या या वाढीव मुदतीची माहिती पोलिसांना त्यांच्या प्रमुखांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पोलिसांनी या वाढीव मुदतीची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनांच्या कागदपत्रांची छाननी करताना वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही, याची पोलीस विभागाने खबरदारी घेणे अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.