Join us

मुंबईतून बॉलिवूड कोणीही अन्यत्र हलवू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि उद्योगनगरी आहे. अनेक उद्योगांप्रमाणे चित्रपटसृष्टीच्या उद्योगाला अनुकूल आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि उद्योगनगरी आहे. अनेक उद्योगांप्रमाणे चित्रपटसृष्टीच्या उद्योगाला अनुकूल आहे. त्यामुळे कोणीही मुंबईतून सिनेउद्योग अन्यत्र हलवू शकत नाही. उत्तर प्रदेशात बॉलिवूडसारखा चित्रपट उद्योग उभा करण्याचा प्रयत्न चांगला आहे. पण, मुंबईच्या बॉलिवूडने जगात आपला ठसा उमटवला आहे, असे आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी इलेक्ट्रिक रिक्षाच्या उद्घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या स्पर्धात्मक युगात बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा हे प्रदूषणविरहित वाहन आहे. बेरोजगारांनी रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा, मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक रिक्षा या वाहनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.