Join us

Maharashtra Election 2019 : घोटाळेबाजांना कोणी वाचवू शकणार नाही; आमच्या सरकारच्या काळात मुंबई सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 6:18 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची आता खैर नाही

मुंबई : पंधरा वर्षांच्या आघाडी सरकारच्या काळात राज्यात भ्रष्टाचाराचे सिंचन करणाºया घोटाळेबाजांना आणि देशात बेईमानांच्या खात्यात कोट्यवधी रुपये वळविणाºया लोकांची आता खैर नाही. त्यांच्या साफसफाईची सुरुवात झाली असून प्रामाणिक माणसांच्या कमाईवर कोणतीही आच आम्ही येऊ देणार नाही. पूर्वी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेली मुंबई आमच्या सरकारच्या काळात मात्र सुरक्षित आहे आणि राहील, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महायुतीच्या प्रचार सभेत काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अरविंद सावंत, रामदास आठवले, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्याया सभेत मोदी यांनी ‘तू जा मैंआता हूं’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री बदलाची पद्धत आम्ही बंद केली. महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले आणि यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असेच स्थिर आणि प्रामाणिक सरकार दिले जाईल अशी ग्वाही दिली.मुंबईकर बॉम्बस्फोट कधीही विसरू शकणार नाहीत. दहशतवाद्यांचे हल्ले, बॉम्बस्फोट हे आधीच्या सरकारमध्ये होत असत. आज ती परिस्थिती नाही. कारण आता आपली खैर नाही हे दहशतवादास खतपाणी घालणाऱ्यांना पुरते ठाऊक आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या सरकारच्या काळात अतिरेकी हल्ले झाले त्या वेळी कोणाचे समर्थन करत होते, असा सवाल करून मोदी म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक हा फक्त एक शब्द नाही, तर भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांची रीती आणि नीती त्यातून दिसून येते.

कलम ३७० आणि ३५ अ रद्द करून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर आमच्याच सरकारने दिले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करीत असल्याबद्दल मोदी यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी सदैव मदत करीत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. आघाडी सरकारच्या काळामध्ये पायाभूत सुविधांचा एकही मोठा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आपल्या सरकारने त्याला गती दिली. एक नवीन आधुनिक मुंबई उभारणे हे आपले लक्ष्य आहे, असे फडणवीस म्हणाले.महायुतीच्या बीकेसीतील प्रचारसभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नमस्कार करताच त्यांनी सहजपणे त्यांचा हात हाती घेतला आणि त्यांना आपल्या शेजारी बसवून घेतले. तो क्षण अनुभवणाºया मुख्यमंत्र्यांच्या चेहºयावरही स्मितहास्य उमटले. शेजारी रामदास आठवले.

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019