जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड-१९ चे राज्यात विशेषता: मुंबईत थैमान सुरू असताना राज्य सरकारने मंगळवारी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संशयित मृतदेहाचा पंचनामा (इनक्युस्ट) केला जाणार नाही. या कार्यवाहीत मृतदेहाच्या संपर्कात असलेल्या डाँक्टर,आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनाही कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.मृताचे इनक्युस्ट न करण्याबाबतच्या आदेशाचे गृह विभागाकडून अध्यादेशही काढण्यात आला.त्यामुळे संबधित यंत्रणेचा धोका टळल्याने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.राज्यात मंगळवार अखेरपर्यत कोरोनामुळे ५२ जणाचा मृत्यू झाला असून सर्वाधिक ३४ जण मुंबईतील आहेत. तर ८६८ रूग्ण असून त्यामध्ये ५२५ मुंबईतील आहेत. हा विषाणूचा वेग गेल्या आठवडाभरापासून सातत्याने वेगाने वाढत आहे.एखाद्या नागरिकाचा अकस्मित किंवा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यास त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्याचा इनक्यूस्ट करणे पोलिसांसाठी अत्यावश्यक असते. त्याची प्रकिया जवळपास पंचनाम्या सारखीच असते. त्यामध्ये मृताच्या शरीराचा अवयवाच्या ठराविक भाग, तसेच त्याच्या बाजूला असलेल्या साहित्याची सखोल तपासणी करावी लागते.मात्र सद्या कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने त्याबाबत पुरेशी खबरदारी घेऊन ही मृत पावलेल्या व्यक्तीचे इनक्युस्ट करणे डाँक्टर, आरोग्य सेवक व पोलिसांसाठी धोकादायक बाब बनली होती, त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा दाट शक्यता असून त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे वरिष्ठ तन्य व जाणकाराचे मत पडले.त्यामुळे इन्क्युस्ट न करण्याचा निर्णय घेण्यात आला.साथरोग नियंत्रण कायद्यान्वये निर्णयकोरानामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे इनक्युस्ट न करण्यासाठी साथ रोग नियंत्रण कायदा१८९७ मधील भाग दोनसह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५मधील तरतुदी अन्वये लागू करण्यात आला आहे. जोपर्यत कायदा लागू आहे. तोपर्यत ही सूट कायम असणार आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्याचा पंचनामा नाही; सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 6:17 AM