जुन्या पेन्शनसाठी ‘नो पेन्शन, नो व्होट’, शासकीय कर्मचारी दाराबाहेर लावणार पाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 06:38 AM2019-01-11T06:38:48+5:302019-01-11T06:39:12+5:30

नवी मोहीम : शासकीय कर्मचारी दाराबाहेर लावणार पाटी

'No pension, no vote' for old pension, government employee to leave door | जुन्या पेन्शनसाठी ‘नो पेन्शन, नो व्होट’, शासकीय कर्मचारी दाराबाहेर लावणार पाटी

जुन्या पेन्शनसाठी ‘नो पेन्शन, नो व्होट’, शासकीय कर्मचारी दाराबाहेर लावणार पाटी

Next

मुंबई : नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संपात सामील झाल्यानंतर, शासकीय कर्मचाऱ्यांनी आता नवी मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील ३ लाख कर्मचारी आपल्या दाराबाहेर नवी पेन्शन योजना रद्द करून, जुनी योजना लागू करणारी पाटी लावणार आहेत, तसेच जो राजकीय पक्ष ही मागणी मान्य करेल, त्याच्याच पारड्यात शासकीय कर्मचाºयांच्या कुटुंबीयांची मते पडतील, असा पवित्रा कर्मचाºयांच्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने बुधवारी जाहीर केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले की, अनेक आंदोलने केल्यानंतरही २००५ सालानंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना शासनाने केवळ आश्वासनेच दिली आहेत. जुन्या पेन्शन योजनेऐवजी नवी पेन्शन योजना लागू केल्याने शासकीय कर्मचाºयांचे भवितव्यच अंधारात आले आहे. मृत शासकीय कर्मचाºयांच्या कुटुंबीयांवर तर भीक मागण्याची वेळ आली आहे. याउलट उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, राजस्थान अशा आकाराने छोट्या-मोठ्या राज्यांमध्येही शासकीय कर्मचाºयांसाठी योजनेत बदल करण्यात आले आहेत. याउलट येथील राज्य शासन कोणत्याही प्रकारचे बदल करण्यास उत्सुक दिसत नाही. परिणामी, तीन लाख कर्मचाºयांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याच्या घराबाहेर नव्या योजनेचा उल्लेख असलेली पाटी लावणार आहे.

कर्मचारी दाखवणार मतांची ताकद
राज्यातील प्रत्येक विधानसभेतील कर्मचाºयांची व मतदान करणाºया कुटुंबीयांची माहिती संकलित करण्यास संघटनेने सुरुवात केली आहे. या माहितीच्या आधारावर कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबातील मतदान करणाºया सदस्यांची संख्या संघटनेच्या हाती येणार आहे. या संख्येच्या जोरावर मागणी मान्य करून घेतली जाईल, असे संघटनेने सांगितले.

Web Title: 'No pension, no vote' for old pension, government employee to leave door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई