लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाई, ताई, माई, दादांवर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या राजकीय अधिकृत, अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टरवर महापालिकेकडून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयातून याबाबतचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात येत असून, त्यासाठीचा फौजफाटा आणि मनुष्यबळही तैनात आहे, अशी माहिती महापालिकेचे सहआयुक्त (विशेष) रमेश पोवार यांनी दिली.
सर्व विभागीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्याची पूर्वकल्पना आहे. आचारसंहितेदरम्यान ही कारवाई करण्याबाबतचे लेखी आदेश काढले जातील. प्रक्रिया सुरू होईल. शनिवारी लेखी आदेश सर्व विभागीय कार्यालयांना पाठविले जातील. शिवाय अतिरिक्त फौजफाटा किंवा अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत नाही. स्थानिक स्तरावर हे सगळे सज्ज असते. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी कक्ष असतो आणि त्यानुसार कारवाई केली जाते, असेही रमेश पोवार यांनी सांगितले.
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात आता शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीला लगाम घातला जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व नाके, सार्वजनिक ठिकाणे राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीने झाकोळून गेली आहेत. विशेषत: भाजप, शिंदे आणि ठाकरे गटाचे शुभेच्छा देणारे बॅनर्स यामध्ये अधिक आहेत.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान कारवाई...
महिना बॅनर्स बोर्डस पोस्टर्सजानेवारी २९६ ८१ ५१ फेब्रूवारी २४८ ० ० मार्च ३८६ ३ ३८ एप्रिल २२४ ० ०मे २४३ ० ०जून ३३८ ० ११ जुलै १२३ ८ ५ऑगस्ट ७६ ३४ ०सप्टेंबर २०१६ १६७३ ८३ ऑक्टोबर ५५३ ९१५ ०एकूण ४५०३ २७१४ १८८