'डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम द्या,अन्यथा खळ्ळ खट्याक; मनसेचा मल्टिप्लेक्सना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 08:29 AM2018-11-10T08:29:27+5:302018-11-10T14:50:52+5:30

अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, सिनेमाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.

no prime time shows for marathi movie dr kashinath ghanekar mns warns theater owners | 'डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम द्या,अन्यथा खळ्ळ खट्याक; मनसेचा मल्टिप्लेक्सना इशारा

'डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम द्या,अन्यथा खळ्ळ खट्याक; मनसेचा मल्टिप्लेक्सना इशारा

Next
ठळक मुद्देमल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक'डॉ.काशीनाथ घाणेकर'ला प्राईट टाईम न दिल्यास तोडफोड करू - मनसे'डॉ.काशीनाथ घाणेकर'ला तात्काळ प्राईम टाईम देण्याची मागणी

कल्याण : अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, सिनेमाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. कल्याणमधील मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सिनेमाला तात्काळ प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळच्या वेळेतील शो न दिल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मल्टिप्लेक्सना देण्यात आला आहे. .'..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला प्राईट टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करू, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे. काशीनाथ घाणेकर सिनेमाचा दिवसभरात केवळ एकच शो दाखवण्यात येत असल्यानं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!)

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र सिनेमाचे कौतुक केले जात आहे. कल्याणमध्ये बहुंताश परिसर हा मराठी भाषिक आहे, मात्र सिनेमॅक्स थिएटरमध्ये या सिनेमाचा केवळ दुपारी तीन वाजताच शो आहे. यामुळे सिनेरसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

दुसरीकडे, अमिताभ बच्चन- आमिर खान यांच्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान सिनेमाचे दिवसभरात तब्बल 8 शो सुरू आहेत. सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट आहे, मात्र कथेमुळे प्रेक्षकांची निराशा झाल्यानं ठग्ज ऑफ हिंदोस्तानकडे पाठ फिरवली गेली आहे. एकूणच हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू पसरवण्यात कमी पडला आहे. या तुलनेत काशीनाथ घाणेकर सिनेमांला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. पण थिएटरमध्ये सिनेमाला प्राईम टाईमच देण्यात आलेला नाही. याविरोधातच मनसे आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सिनेमांना आज प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे. यासाठी मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
 

Web Title: no prime time shows for marathi movie dr kashinath ghanekar mns warns theater owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.