नाणारमध्ये प्रकल्प होणार नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:42 AM2021-03-11T02:42:43+5:302021-03-11T02:43:09+5:30

कारशेड कांजूरमध्येच होणार

No project in Nanar: CM | नाणारमध्ये प्रकल्प होणार नाही : मुख्यमंत्री

नाणारमध्ये प्रकल्प होणार नाही : मुख्यमंत्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाणारमध्ये तेल शुद्धिकरण प्रकल्प करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे तिथे हा प्रकल्प होणार नाही. आता यापुढे नाणार प्रकल्प म्हणू नका केवळ तेलशुद्धिकरण प्रकल्प म्हणा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आम्ही त्या भागात जमिनी घेतलेल्या आहेत, असे सांगत काही लोक मला भेटायला आलेले होते पण मी त्यांना स्पष्टच सांगितले की पर्यावरणाच्या मुद्यावरून त्यांना हा प्रकल्प तेथे नको आहे’ अशी माहिती ठाकरे यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, कोणताही उद्योग हा राज्याच्या हिताचाच असतो. तो राज्यातून जावू नये ही आमचीही भूमिका आहे पण नाणारशिवाय अन्यत्र जिथे स्थानिकांचा विरोध नाही तिथे तेलशुद्धिकरण प्रकल्प व्हायला हवा.

कारशेड कांजूरमध्येच होणार
मेट्रो ३ चा कारशेड कांजूर मार्गमध्येच उभारला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. आरेमध्ये कारशेडवर झालेला खर्च अजिबात वाया जाणार नाही. भविष्यातील पाचपन्नास वर्षांचा विचार करता कारशेड कांजूरमार्गमध्येच होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

Web Title: No project in Nanar: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.