Join us

मुंबई शहर कोरडे; उपनगराला श्रावणधारांचा किंचित मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 4:17 AM

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला झोडपलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. विशेषत: पाऊस मुंबईतही विश्रांतीवर आहे.

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला झोडपलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. विशेषत: पाऊसमुंबईतही विश्रांतीवर असून, बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात दुपारी तुरळक ठिकाणी किंचित का होईना कोसळलेल्या श्रावणधारांनी मुंबईकरांना झोडपून काढले.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी सकाळी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास मात्र पूर्व उपनगरात बहुतांश ठिकाणी अगदी काही क्षणांसाठी का होईना दाखल झालेल्या मोठ्या श्रावणधारांनी मुंबईकरांना झोडपून काढले. त्यानंतर मात्र ठिकठिकाणी हलक्या सरी कोसळत असल्याचे चित्र होते.आज मुंबई राहणार ढगाळमुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.राज्यासाठी अंदाज१५ आॅगस्ट : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

टॅग्स :पाऊसमुंबई