मुंबई : सहा दिवस पायपीट करून १८० किमी अंतर कापत सोमवारी मुंबईत धडकलेल्या किसान लाँग मार्चशी आमचा संबंध नव्हता, असे स्पष्टीकरण शेतक-यांसाठी लढणाºया सुकाणू समितीने दिले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, शेतकºयांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुकाणू समितीतर्फे या वेळी ‘असहकार आंदोलन’ व ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली.सुकाणू समितीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला. हा मोर्चा किसान संघाने काढला होता, त्याचे निमंत्रण सुकाणू समितीला नव्हते, अशीही उत्तरे समितीच्या सदस्यांनी दिली. मात्र माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांनंतर समितीच्या पदाधिकाºयांनी सारवासारव केली. या वेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले की, शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती ही सुकाणू समितीची मुख्य मागणी आहे. कालच्या मोर्चात मुख्यमंत्र्यांनी फक्त सहा महिन्यांची मुदतवाढ घेतली आहे.मुळात दुधाचे दर ठरवण्यासाठी सहा महिने कशाला लागतात. या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लबाड्या सुरू आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने १ मार्चपासून असहकार आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात शेतकरी कोणताही कर, कर्ज आणि वीजबिल भरणार नाहीत.>अन्नदात्यासाठी अन्नत्यागअन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एकदिवसीय उपोषण व धरणे आंदोलन १९ मार्चला राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले जाईल. ३२ वर्षांपूर्वी याच दिवशी साहेबराव करपे या पहिल्या शेतकºयाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा : २३ मार्च या हुतात्मा दिनापासून राज्यातील ३६ जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यात शेतकºयांचे जत्थे फिरतील. इस्लामपूर येथून अभिवादन यात्रेस सुरुवात होईल. यामध्ये रोज ५ जत्थ्यांच्या प्रत्येकी ३ प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात १५ सभा होतील. अशा प्रकारे २७ एप्रिल रोजी पुणे येथे पोहोचेपर्यंत एकूण ५४० सभा होतील.>असे असेल आंदोलन२२ डिसेंबर २०१७ पासून आजपर्यंतसुकाणू समितीच्या पाच बैठका झाल्या आहेत. आजच्या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले आहेत.सविनय कायदेभंग आंदोलनशेतकरी जागर यात्रेत ‘स्वेच्छेने सविनय कायदेभंग करून स्वत:ला अटक करून घेत आहोत’ असे अर्ज शेतकºयांकडून भरून घेतले जातील. कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३० एप्रिलला सर्व शेतकरी कुटुंबासह सविनय कायदेभंग आंदोलन करून तुरुंगात जातील.त्या वेळी शेतकºयांना ज्या मैदानात अडवले जाईल, तेथेच न्यायालय घोषित करून सरकारवर मागण्या मान्य करण्याची नामुष्की ओढावली जाईल, असा दावा सुकाणू समितीचे सदस्य अशोक ढमाले यांनी केला आहे.
किसान मोर्चाशी संबंध नाही!, संपूर्ण कर्जमुक्तीसाठी असहकार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 6:39 AM