भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याही वेळी होऊ शकतो मोठा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 12:09 PM2018-05-07T12:09:15+5:302018-05-07T12:09:15+5:30
रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो ते पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची कोणतीही व्यवस्था नाही
मुंबई - भारतीय रेल्वेतून दरमाह सुमारे 10 कोटी टन माल (वस्तू) ने-आण करतात. तरी रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो ते पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची कोणतीही व्यवस्था नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पश्चिम रेल्वेचे जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, श्रीमती आरती सिंह परिहार यांनी दिली आहे.
शेख यांनी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून मुंबईतील मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, सीएसटी, दादर, लोकमान्य तिलक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर पार्सल केला जाणारा माल (वस्तूला) सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची काय आहे? व पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅनर लावण्याची जबाबदारी कोणाची आहे ? तसेच पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासणीसाठी काय नियम व कायदा आहे? तसेच कंत्राटदाराचे नाव आणि कंत्राट वाटपाबाबत माहिती विचारली होती.
विचारण्यात आलेल्या माहिती संदर्भात पश्चिम रेल्वेचे जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, श्रीमती आरती सिंह परिहार यांनी दिली आहे. माहितीप्रमाणे मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरीवली या स्थानकांवर पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची सध्या कोणतीही व्यवस्था नाही. तसेच पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅनर लावण्याची जबाबदारी वाणिज्य विभागीची आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्सल स्कॅन व तपासणीसाठी नियम व कायदा प्रस्तावित आहे. तसेच पार्सलसाठी काही गाड्यांना कंत्राटावर दिले आहे. तरी मध्य रेल्वेचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती देण्यास नाकारले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते भारतीय जिथे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश करण्यासाठी मेटल डिटेक्टर मशिनमधून जावे लागते आणि प्रवाशांना त्यांची वस्तू स्कॅनर मशिनमध्ये टाकावे लागतात. दुसरीकडे भारतीय रेल्वे दर महा कोट्यवधी टन माल (वस्तू) पार्सलला कोणतीही तपासणी व स्कॅन न करता अनेक रेल्वेगाड्यातून ने-आण करतात.
जर कोणत्याही दहशतवादी संघटना एवढ्या मोठया रेल्वे सुरक्षिततेच्या त्रुटीचा फायदा घेऊन कोणत्याही स्फोटक ऑब्जेक्ट (बॉम्ब) पार्सल करून कोणत्याही मोठ्या दहशतवादी हल्ला करू शकतात. तर याला जबाबदार कोण राहणार ? रेल्वे प्रशासनांनी आतापर्यंत पार्सल केंद्रावर स्कॅनर का नाही लावला ? तसेच रेल्वे प्रशासनांनी पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने माल (वस्तू) स्कॅन किंवा तपासण्यासाठी कोणतेही नियम का नाही बनविले? रेलवे प्रशासन मोठी अपघात होण्याची वाट पाहत आहे का ? यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेअरमन अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून सर्व पार्सल केंद्रावर स्कॅनर लावण्याची मागणी केली आहे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य ठराविक उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा केली आहे.