ना शाळा, ना परीक्षा तरीही; सोळा लाख विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:12+5:302021-06-23T04:06:12+5:30

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले ...

No school, no exams anyway; Sixteen lakh students pass | ना शाळा, ना परीक्षा तरीही; सोळा लाख विद्यार्थी पास

ना शाळा, ना परीक्षा तरीही; सोळा लाख विद्यार्थी पास

Next

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले जात आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर टप्प्याने सहावी वे बारावीचे वर्ग राज्यातील इतर जिल्ह्यांत काही दिवस प्रत्यक्ष सुरू झाले होते; मात्र मुंबईत शाळा अनलॉक झाल्याच नाहीत. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेशाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यामुळे मुंबई जिल्ह्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गातील १६ लाख ७० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात प्रवेशित झाले आहेत.

या विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी ऑनलाइन शिक्षणाचा त्यांना फारसा फायदा झाला नसल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे असून, प्रत्यक्ष वर्गातून शिक्षण देणेच योग्य असल्याने लवकरात लवकर प्रत्यक्ष शाळा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.

विदयार्थी संख्या - पालिका - डिव्हायडी (उपसांचालक कार्यालयांतर्गत)

पहिली ते पाचवी - ५९०९८८ - २३२३६६

सहावी ते आठवी - १०२५५४ - ४२२००५

नववी - १९१४२-१५९५९७

अकरावी - ०- १४४३४३

चौकट

फायदे :

- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले. विद्यार्थ्यांना यातून स्वयंअध्ययनाची गोडी लागण्यास मदत झाली.

- तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त झाले शिवाय विविध विषयांसाठी विविध तज्ज्ञ मार्गदर्शन.

- ग्रामीण व शहरी भागात अनेक सेवाभावी संस्था या शैक्षणिक संस्था, युवक, युवती मुलांच्या शिक्षणासाठी पुढे सरसावल्या आहेत.

तोटे :

-ऑनलाइन शिक्षणामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. काही भागांत इंटरनेट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले. शाळा बंद, शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.

- शिक्षणातील मूलभूत घटकांचा व्यवस्थित अभ्यास न झाल्याने अनेक विषय समजण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

-विद्यार्थ्यांना सतत ऑनलाइन राहिल्यामुळे मानसिक ताण, थकवा येतच आहे शिवाय एकाच जागेवर अभ्यास केल्याने, मैदानी खेळ नसल्यामुळे शारीरिक समस्या ही वाढत आहेत.

संसाधनांचा खर्च आवाक्याबाहेर

ऑनलाइन शिक्षणात सर्वांत मोठी अडचण संसाधनांची आहे. त्याचबरोबर नेटवर्क कनेक्टिव्हिटीचासुद्धा मोठा त्रास आहे. त्यामुळे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, कनेक्टिव्हिटी या सुविधांअभावी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. काही नामांकित शाळेत ऑनलाइन शिक्षण झाले खरे; मात्र विद्यार्थ्यांनी त्यांना किती सकारात्मक प्रतिसाद दिला. याचे मूल्यांकन होऊ शकले नाही. परीक्षा झाली असती तर ऑनलाइन शिक्षणाची सकारात्मकता दिसून आली असती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: No school, no exams anyway; Sixteen lakh students pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.