दिवाळीत आवाज नाही; केवळ रोषणाई होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:30 AM2018-10-24T04:30:37+5:302018-10-24T04:30:51+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे फटाके विक्रीवर तूर्तास तरी कोणताही परिणाम झाला नाही.

 No sound in Diwali; Only roshana will happen! | दिवाळीत आवाज नाही; केवळ रोषणाई होणार!

दिवाळीत आवाज नाही; केवळ रोषणाई होणार!

Next

- चेतन ननावरे 
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे फटाके विक्रीवर तूर्तास तरी कोणताही परिणाम झाला नाही. मुळात आवाज होणाऱ्या फटाक्यांना बगल देत, विक्रेत्यांकडून रोषणाई होणाºया फटाक्यांची विक्री मोठ्या संख्येने सुरू आहे, अशी माहिती मुंबई अँड ठाणे डिस्ट्रिक्ट फायरवर्क्स डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस मिनेश मेहता यांनी दिली.
मेहता म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे सविस्तर प्रतिक्रिया इतक्यात व्यक्त करणे चुकीचे ठरेल. मात्र, प्राथमिक माहितीनुसार फटाक्यावर बंदी लादली नसल्याने, विक्रेत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यावरणाबाबत होत असलेल्या जनजागतीमुळे ग्राहकांकडून कमी आवाज आणि अधिक रोषणाई करणाºया फटाक्यांची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे, उत्पादकांकडून रोषणाई होणाºया फटाक्यांची आवक वाढविली आहे. विक्रेते अब्दुल्ला गिया म्हणाले की, न्यायालयात असलेल्या याचिकेमुळे आधीच आवाज व प्रदूषण अधिक करणाºया फटाक्यांची आवक ५० टक्क्यांनी कमी केली होती. आता उत्पादकांशी चर्चा करून, या संदर्भात मागविलेला माल परत घेण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.
>फटाक्यांत आली वैविध्यता!
फुलबाजा, भुईचक्र आणि पाऊस (फाउंटन) अशा रोषणाई करणाºया फटाक्यांना सर्वाधिक मागणी असल्याची माहिती मिनेश मेहता यांनी दिली. ते म्हणाले की, एकूण व्यवसायातील सुमारे ७५ टक्के धंदा हा याच फटाक्यांमधून होतो. कमी प्रदूषण करताना, अधिक रोषणाई करणाºया या फटाक्यांत आता नावीन्यता येऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांचीही त्याला अधिक पसंती मिळत आहे.
हे फटाके पाहाच...
यंदा बाजारात गुलाबी रंगाची उधळण करणाºया चक्रीची चर्चा आहे. साधारणत: चक्रीमधून चंदेरी रंगाची उधळण होते. मात्र, या नव्या रूपातील चक्रीतून गुलाबी रंगाचा प्रकाश पसरतो. २०० ते २५० रुपयांमध्ये पाच नग येणाºया या फटाक्याची सर्वांनाच भुरळ पडेल, असे विक्रेत्यांना वाटते.
>कोट्यवधींची उलाढाल
मुंबईसह ठाण्यात सध्या ८०हून अधिक लहान, तर सुमारे ३० मोठे अधिकृत परवानाधारक फटाके विक्रेते आहेत. याशिवाय शेकडो फेरीवाले फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे येथील बाजारपेठही २५० कोटींहून अधिक रुपयांची असल्याचे विक्रेते सांगतात.
>आधी निर्णय अपेक्षित!
मुळात दिवाळीच्या तोंडावर अशा प्रकारे निर्णय जाहीर झाल्याने विक्रेत्यांची व उत्पादकांची कोंडी होते. न्यायालयात अशा प्रकरणांबाबत उत्पादनाआधीच निर्णय अपेक्षित आहे. जेणेकरून उत्पादक किंवा विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया एका विक्रेत्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली.

Web Title:  No sound in Diwali; Only roshana will happen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.