Join us

CoronaVirus News: हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे सेवा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 10:28 PM

विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी 

मुंबई : लॉकडाऊन कालावधीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ही सेवा धावते. मात्र २ जूनपासून हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे धावत नसल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली. मध्य रेल्वे मार्गावर धावत असलेल्या लोकल, एक्सप्रेसमध्ये फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने १ जून रोजी रेल्वे कर्मचाऱ्यांनी विद्याविहार येथे आंदोलन केले. मात्र दुसऱ्या दिवशी पासून हार्बर मार्गावरून लोकल, एक्सप्रेस धावत नसल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली. परिणामी, हार्बर मार्गावरील कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठावे कठीण झाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण २२ विशेष रेल्वे धावत आहेत. मात्र मध्य रेल्वे मार्गावर ७ विशेष रेल्वे धावत आहेत. परिणामी, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. यासंदर्भात, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाला विचारले असता, संबंधित प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. 

मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जादा विशेष रेल्वे सोडणे आवश्यक आहे. मागील पाच दिवसापासून हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे धावत नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कसे पोहचायचे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी त्वरित विशेष रेल्वे सेवा सुरू करावी, अशी प्रतिक्रिया वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस जे. आर. भोसले यांनी दिली. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहार्बर रेल्वे