स्पेशल ट्रीटमेंट नको, पण उपचार तर करा; बेस्ट अभियंत्याची प्रशासनाला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 02:13 AM2020-05-26T02:13:20+5:302020-05-26T02:13:33+5:30

वेल्फेअर, मेडिकल विभागात ५० बेडची सोय करा

 No special treatment, but treatment; Best Engineer request to the administration | स्पेशल ट्रीटमेंट नको, पण उपचार तर करा; बेस्ट अभियंत्याची प्रशासनाला विनंती

स्पेशल ट्रीटमेंट नको, पण उपचार तर करा; बेस्ट अभियंत्याची प्रशासनाला विनंती

googlenewsNext

- गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : दहिसरमधील बेस्ट अभियंत्यांच्या मृत्यूनंतर दहा तास रुग्णवाहिकेअभावी त्यांचा मृतदेह घरातच फुगल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. आपल्या सहकाऱ्यासोबत जे घडले ते समजल्यानंतर बेस्टचे अन्य अभियंते आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यापुढे तरी एखादा सहकारी आजारी पडल्यास त्याला ‘स्पेशल ट्रीटमेंट नको, पण निदान उपचार तरी द्या’ असे सांगत वेल्फेअर आणि मेडिकल विभागात बेडची सोय करण्याची विनंती आता बेस्ट अभियंत्यांकडून प्रशासनाला करण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टचा स्वत:चा स्वतंत्र वेल्फेअर आणि मेडिकल विभाग आहे. ज्यात वीस ते पंचवीस डॉक्टर आॅनरोल कार्यरत आहेत. तसेच या विभागात जवळपास ५० बेड राहतील इतकी जागा आहे. त्यामुळे जीव धोक्यात टाकून काम करणाºया बेस्टच्या अधिकारी व कर्मचाºयाची प्रकृती बिघडल्यास त्यांच्यावर प्रथम या विभागात प्राथमिक तपासणी व चाचणी करून नंतर त्यांची रवानगी अन्य रुग्णालयात करण्यात यावी, अशी अभियंत्यांची मागणी आहे.

‘आमच्या विभागातील डॉक्टरने आमची निदान तपासणी तरी करावी इतकी अपेक्षा आम्ही करत आहोत. आम्हाला यासाठी विशेष ट्रीटमेंट नको, पण आमच्यावर निदान ट्रीटमेंट तरी करण्यात यावी. जेणेकरून आमच्या दहिसरमधल्या सहकाºयावर जी वेळ आली ती आमच्यावर आणि कुटुंबीयांवर तरी येणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा त्या डॉक्टरना पालिकेत समाविष्ट करून घ्यावे जेणेकरून त्या रुग्णांची तरी ते सेवा करतील.

काय आहे प्रकरण?

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाच्या नाकीनऊ आणणाºया धारावीमध्ये मृत उपअभियंत्याचा कार्यरत १९ मे, २०२० रोजी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची लक्षणे कोरोनासदृश असूनही चाचणी न झाल्याने पॅनलवरील डॉक्टरच्या रिमार्कनुसार त्यांना कोरोना संशयित मानण्यात येईल, असे पालिकेच्या आर उत्तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी अविनाश वायदंडे यांनी स्पष्ट केले. जेव्हा की त्यांच्या सोबत राहणाºया त्यांच्या पत्नीच्या चाचणीत त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले असून त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title:  No special treatment, but treatment; Best Engineer request to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.