मुंबई : दुबईहून घरी परतलेल्या काकांनी फिरायला नेले नाही, म्हणून १२ वर्षीय चिमुकल्याने गळफास घेत, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी भांडुपमध्ये घडली. निमकी अॅन्थोनी पिंटो (१२) असे मुलाचे नाव आहे. मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.भांडुप पश्चिमेकडील आंबेवाडी परिसरात निमकी हा आई, वडील, बहीण आणि आजीसोबत राहण्यास होता. पोटात दुखत असल्याचे कारण सांगून, सोमवारी शाळेत जाण्यास निमकीने नकार दिला. आई- वडील कामासाठी निघून गेल्यानंतर, तो पोटमाळ््यावरील खोलीत गेला. खालच्या खोलीत आजी आणि बहीण होती. वरच्या खोलीत असलेल्या लोखंडी खांबाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत, त्याने आत्महत्या केली. सायंकाळी पाचच्या सुमारास घरी परतलेले काका वरच्या खोलीत गेले. वारंवार आवाज देऊनही निमकीने प्रतिसाद दिला नाही. अखेर आतमध्ये डोकावले असता, निमकी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी निमकीचे काका दुबईवरून घरी आले होते. त्याने काकांकडे सोमवारी बाहेर फिरायला नेण्यासाठी हट्ट केला. मात्र, त्यांना काम असल्याने त्यांनी नंतर जाऊ, असे सांगून ते एकटेच बाहेर पडले. याच रागातून निमकीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली. निमकीच्या मृत्यूमुळे पिंटो कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)रविवारी निमकीचे काका दुबईवरून घरी आले होते. त्याने काकांकडे सोमवारी बाहेर फिरायला नेण्यासाठी हट्ट केला. मात्र, त्यांना काम असल्याने त्यांनी नंतर जाऊ, असे सांगून ते एकटेच बाहेर पडले. याच रागातून निमकीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली. निमकीच्या मृत्यूमुळे पिंटो कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
फिरायला न नेल्याने चिमुकल्याची आत्महत्या
By admin | Published: December 15, 2015 1:56 AM