Join us

तूर्तास करवाढ नाही, आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवीन देयके पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 2:02 PM

मालमत्ता करांच्या वाढीव देयकांमुळे मुंबईकरांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम व नाराजीमुळे आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिले.

मुंबई : मुंबईकरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ यंदा झालेली नाही. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालिकेकडून पाठविण्यात आलेल्या देयकांमध्ये देय असलेली रक्कम, शुल्क आकारण्यायोग्य रक्कम वेगळी आहे. मालमत्ताधारकांनी देय रक्कम द्यायची आहे, जी मागील मालमत्ता कराएवढीच असणार आहे. मात्र, मालमत्ताधारकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आताची देयके मागे घेऊन नवीन देयके पाठविली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. मालमत्ता करांच्या वाढीव देयकांमुळे मुंबईकरांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम व नाराजीमुळे आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिले. पालिकेकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मुंबईकरांना मालमत्ता कारची देयके पाठविण्यास सुरूवात झाली असून, ही देयके तात्पुरती असली तरी त्यामध्ये १५ ते ४० टक्क्यांची वाढ असल्याने ती वादात सापडली आहेत. माजी नगरसेवकांकडून या देयकावर आक्षेप घेण्यात आले आहेत. 

 सर्वोच्च न्यायालयाने भांडवली मूल्याधारित करप्रणालीत काही नियम वगळण्याची सूचना केली आहे. तसेच हे नियम नव्याने तयार करण्यास सांगितले आहे. मालमत्तांचे नव्याने मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. असे असताना पालिका वाढीव देयके कशी काय पाठवू शकते, असा सवाल माजी नगरसेवकांनी उपस्थित केला. 

-  यंदा देयकेच पाठविण्यात आली नसल्यामुळे पालिकेला मालमत्ता कराची वसुली अतिशय कमी (केवळ ६०० कोटी) झाली आहे.-  यावर्षी पालिकेने सात हजार कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे.-  सन २०२३-२४ आणि २०२५ या पुढील दोन वर्षांसाठी करवाढ करण्यात आली आहे. त्याचा मसुदा पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून बनविण्यात आला आहे.-  पालिकेने सन २०१० पासून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली.-  सन २०२३-२४ मध्ये मालमत्ता करातून अपेक्षित उत्पन्न : ७ हजार कोटी

मालमत्ताधारक : ४ लाख २० हजारनिवासी : १ लाख ३७ हजारव्यावसायिक : ६५ हजारांहून अधिकऔद्योगिक : सहा हजारभूभाग आणि इतर : १२ हजार 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकरमुंबई