Join us

३ लाख प्रवाशांना ‘नो टेन्शन’, दिवाळीसाठी ‘मरे’च्या विशेष ४२५ ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 6:00 AM

सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती व कोल्हापूरसाठी चालविण्यात येत आहेत.  मध्य रेल्वेच्या या पुढाकारामुळे  तीन लाख प्रवाशांना याच्या फायदा होणार आहे. 

मुंबई : दिवाळी, छठ पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने यंदा ४२५ उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या विशेष गाड्यांद्वारे सुमारे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती व कोल्हापूरसाठी चालविण्यात येत आहेत.  मध्य रेल्वेच्या या पुढाकारामुळे  तीन लाख प्रवाशांना याच्या फायदा होणार आहे. 

उत्सव स्पेशल गाड्यांची संख्याकोल्हापूर- ११४, नागपूर-अमरावती- १०३, दानापुर- ६०, थिविम-मंगळूरू- ४०, कानपूर-वाराणसी-गोरखपूर- ३८, समिस्तीपूर-छापरा-हटिया- ३६, इंदौर- १८. नांदेड- १६

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, हैद्राबाद दिल्ली, बनारस, पटणा आदी मार्गांवर नियमितपणे धावणाऱ्या  रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाउसफुल्ल झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे