वीज खंडित झाल्यास ‘नो टेन्शन’, वीज ग्राहकांसाठी बेस्टचे नवे संपर्क क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:17 AM2018-06-20T02:17:03+5:302018-06-20T02:17:03+5:30
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमातर्फे वीजपुरवठा खंडित झाल्यास पुरवठा सुरू करण्यासाठी पुन:स्थापना केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमातर्फे वीजपुरवठा खंडित झाल्यास पुरवठा सुरू करण्यासाठी पुन:स्थापना केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. घर किंवा संपूर्ण इमारत, वस्तीमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना विद्युत पुरवठा फ्यूज कंट्रोल आणि फॉल्ट कंट्रोल यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रमाने विविध ठिकाणी विद्युत पुरवठा पुन:स्थापना केंद्रे स्थापन केली असून त्यांचे संपर्क क्रमांकही घोषित केले आहेत.
वैयक्तिक वीजग्राहकांनी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संबंधित फ्यूज कंट्रोलला संपर्क साधवा. मात्र, जर संपूर्ण इमारत किंवा एकाद्या वस्तीत विद्युत पुरवठा खंडित झाल्यास फॉल्ट कंट्रोलला संपर्क साधवा, असे बेस्टने म्हटले आहे. फ्यूज कंट्रोल आणि फॉल्ट कंट्रोल येथील दूरध्वनी सतत व्यस्त असल्यामुळे काही वीजग्राहकांना ८ आणि ९ जून च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांतील खंडित विद्युत पुरवठ्याच्या तक्रारी नोंदविता न आल्याबद्दल काही वीजग्राहकांनी कळविले होते. त्यामुळे आता प्रत्येक केंद्राला दोन भ्रमणध्वनी यंत्रे पुरविण्यात आली आहेत.
जे वीजग्राहक फ्यूज कंट्रोल
किंवा फॉल्ट कंट्रोल येथील
दूरध्वनीवर संपर्क साधू शकत
नाहीत; त्यांना व्हॉट्सअॅप, एसएमएस किंवा मिस कॉलद्वारेही तक्रार
नोंदवता येणार आहे. त्यानंतर कंट्रोल केंद्राचे कर्मचारी संबंधित तक्रारदाराला कॉल करून त्याची तक्रार नोंदवून घेणार आहेत.
>विविध ठिकाणी स्थापित केलेल्या विद्युत पुरवठा पुन:स्थापना केंद्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे -
दादर फ्यूज कंट्रोल विभाग
परेल, शिवडी, आचार्य दोंदे मार्ग उत्तर, माटुंगा पूर्व, वडाळा अॅण्टॉप हिल, सायन, धारावी
दूरध्वनी नंबर २४१२४२४२, २४१२४९१३, २४१२४६७३
व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर ८८२८८४७५६३
एसएमएस नंबर ८८२८८७१६४८
माहीम फ्यूज कंट्रोल विभाग
शीतलादेवी मंदिर, धारावी, एस.व्ही.एस. मार्ग, माटुंगा पश्चिम, कोहिनूर मिल, टिळक ब्रिजची डावी बाजू
दूरध्वनी नंबर २४४४४२४२, २४४६१६३४
व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६५७
एसएमएस नंबर ८८२८८७१६४४
सुपारी बाग फ्यूज कंट्रोल विभाग
आचार्य दोंदे मार्ग एल्फिन्स्टन पूर्व, शिरोडकर मंडई पदपथ, शिवडी स्टेशन पूर्व, बोर्जेस रोड, माझगाव, मध्य मुंबई पूर्व, लालबाग, काळाचौकी, भायखळा
दूरध्वनी नंबर २४११४२४२
व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६४१
एसएमएस नंबर ८८२८८७१६५५
वरळी फ्यूज
कंट्रोल विभाग
प्रभादेवी ताडदेव, एन.एम. जोशी मार्ग, वरळी, शिवाजी पार्क पूर्वकडील भाग, हाजीअली, लोअर परळ पश्चिम
दूरध्वनी नंबर -२४९५४२४२, २४९५३३६३
व्हॉट्सअॅप नंबर - ८८२८८४७५६७
एसएमएस नंबर ८८२८८७१६४५
पाठकवाडी फ्यूज कंट्रोल विभाग
गिरगाव, काळबादेवी भेंडी बाजार
दूरध्वनी नंबर २२०८४२४२, २२०६६३५१
व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८४७५६५
एसएमएस नंबर ८८२८८७१६५३
ताडदेव फ्यूज कंट्रोल विभाग
मध्य मुंबई, नागपाडा, जे.जे. हॉस्पिटल, आॅपेरा हाउस, नेपियन्सी रोड, बीच कँडी हॉस्पिटल, महालक्ष्मी, हाजीअली, ताडदेव पांडे कंपाउंड या ठिकाणांचा समावेश आहे.
दूरध्वनी नंबर २३०९४२४२,
२३०१८१६९, २३०९९६८६
व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६४७
एसएमएस नंबर८८२८८४७५६६
>कुलाबा फ्यूज
कंट्रोल विभाग
बॅकबे, नरिमन पॉइंट, हुतात्मा चौक, फोर्ट
दूरध्वनी नंबर २२१८४२४२, २२१८२७०९, २२१६२६४८
व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६४९
एसएमएस नंबर ८८२८८७१६४३
>मस्जिद फ्यूज कंट्रोल विभाग
मस्जिद बंदर,
माझगाव
दूरध्वनी नंबर २३४७४२४२, २३४५४२९७
व्हॉट्सअॅप नंबर ८८२८८७१६५०
एसएमएस नंबर८८२८८७१६४६
>धारावी फ्यूज कंट्रोल विभाग
धारावी, कटारिया ब्रिज
मोबाइल नंबर ९०२९०११४८२, ९०२९०११३६९
व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर ८८२८८७१६५९
एसएमएस नंबर ८८२८८७१६६०