मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे नो टेन्शन!

By admin | Published: April 7, 2016 01:43 AM2016-04-07T01:43:39+5:302016-04-07T01:43:39+5:30

राज्यात अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिक करीत असताना, मुंबईकर काहीसे नशीबवान ठरले आहेत.तलावांमधील पाण्याची पातळी खालावत असली

No tension of water supply to the Mumbaiites for monsoon! | मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे नो टेन्शन!

मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे नो टेन्शन!

Next

मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिक करीत असताना, मुंबईकर काहीसे नशीबवान ठरले आहेत.तलावांमधील पाण्याची पातळी खालावत असली, तरी सध्या उपलब्ध असलेले पाणी ३० जूनपर्यंत पुरणार आहे़ त्यानंतर मात्र, महापालिकेची मदार राखीव साठ्यावर असणार आहे़
पाण्यासाठी हाणामारी होत असल्याने, लातूरमध्ये पाण्याच्या टाकीवर पोलीस पहारा बसविण्याची वेळ आली आहे़ ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आठवड्यातून तीन वेळाच पाणीपुरवठा होत आहे़ मुंबईत सुदैवाने अद्याप अशी वेळ आलेली नाही़ गेल्या आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे मर्यादित जलसाठ्यातही वर्षभर मुंबईत पाणीपुरवठा सुरू आहे़ मात्र, दररोज होणारी पाणीचोरी व गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे़ त्यातच भातसा धरणातून दररोज ५० दशलक्ष लीटर पाणी, ठाणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे़ त्यामुळे ३० जूनपर्यंत पुरेल, इतकाच जलसाठा आता तलावांमध्ये शिल्लक आहे़ त्यानंतरही पावसाला सुरुवात न झाल्यास, तलावांमधील राखीव साठ्यातून ३० दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीला आज दिली़ (प्रतिनिधी)
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये
१ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़
मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो़
आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू आहे़
पाणीगळती व चोरीमध्ये दररोज २० टक्के म्हणजे, सुमारे ७०० दशलक्ष लीटर वाया जात आहे़
> काय आहे धरणांची स्थिती?
तलावकमालकिमानआजची स्थितीजलसाठा
मोडक सागर१६३़१५१४३़२६१४८़२२२४,७२७
तानसा१२८़६३११८़८७१२३़५०५८,०६२
विहार८०़१२७३़९२७५़८७७,४५२
तुळशी१३९़१७१३१़०७१३५़६२३,८१९
अप्पर वैतरणा६२७़१७६१९़९६२१़०१२७,४५८
भातसा१६६़५३१२९़३६१४२़२५१,८५,४१२
मध्य वैतरणा२८५़००२२०़००२६८़२८१,०१,८७०

Web Title: No tension of water supply to the Mumbaiites for monsoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.