पित्याच्या अंत्यविधीला येण्यास अमेरिकेतील मुलाला नाही वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 04:41 AM2017-11-09T04:41:17+5:302017-11-09T04:44:06+5:30

‘वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद! पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे तुम्हीच परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा...’ अशा आशयाचा मेल धाडून अमेरिकेतल्या मुलाने जन्मदात्या पित्यावरील अंत्यसंस्काराची जबाबदारी झटकली

No time for the baby in America to come to the Father's crematorium | पित्याच्या अंत्यविधीला येण्यास अमेरिकेतील मुलाला नाही वेळ

पित्याच्या अंत्यविधीला येण्यास अमेरिकेतील मुलाला नाही वेळ

Next

मनीषा म्हात्रे
मुंबई : ‘वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद! पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे तुम्हीच परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा...’ अशा आशयाचा मेल धाडून अमेरिकेतल्या मुलाने जन्मदात्या पित्यावरील अंत्यसंस्काराची जबाबदारी झटकली... पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना फोर्ट येथे घडली.
फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो (६०) असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. फोर्ट येथील मोगल इमारतीत राहणारे फ्रान्सिस हे हाँगकाँग बँकेतून अधिकारी पदावर निवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले आणि ती अमेरिकेत स्थायिक झाले. मुलगा केल्विन शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि तिथेच स्थायिक झाला. त्याने आईलाही तेथे बोलावून घेतले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून फ्रान्सिस एकटेच या ठिकाणी राहात होते. चार दिवसांपासून बंद असलेल्या त्यांच्या घरातून रक्त बाहेर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शेजाºयांकडून त्यांची भाची सांचा डिकास्टाचा मोबाइल क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यांनी तिला फ्रान्सिस यांच्या मृत्यू झाल्याचे कळविले.
सांचाने रिना आणि केल्विन यांना मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क न झाल्याने तिने केल्विनला ईमेल पाठविला. उत्तरादाखल केल्विनने पाठविलेला ईमेल वाचून तिच्यासह पोलिसांनाही धक्का बसला.

‘सॉरी, आय एम बिझी नाऊ... मृत्यूची बातमी दिल्याबाबत धन्यवाद! आम्हाला त्यांच्या संपत्तीत रस नाही. त्यामुळे तुम्हीच परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करा. जमल्यास आमच्याकडूनही त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करा...’ असे त्यात म्हटले आहे.

मृत आईशी गप्पा
दोन वर्षांपूर्वी फ्रान्सिस यांच्या आईचे निधन झाले. दोन दिवस ते आईच्या मृतदेहासोबत गप्पा मारत होते. ती आजारी असल्याने गप्प असल्याचे त्यांना वाटले. शेजाºयांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी आईला रुग्णालयात नेले. तेव्हा त्यांचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘कुटुंबीयांनीच पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा नकार कायम राहिल्यास, भाचीकडेच मृतदेह सुपुर्द करण्याचा विचार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: No time for the baby in America to come to the Father's crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.